शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Suzuki Cars: मारुती 'या' लोकप्रिय कारवर देतेय ४१ हजारापर्यंतची सूट, मायलेजही मिळतंय ३४ किमीपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:26 PM

1 / 6
मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) 5-सीटर हॅचबॅक कार वॅगन आर (WagonR) ही ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या अल्टो नंतर सर्वोत्तम कामगिरी करणारी दुसरी कार ठरली होती. आता, वर्षाच्या शेवटी ऑफरचा एक भाग म्हणून, मारुती सुझुकी WagonR सह त्याच्या अनेक कारवर सूट देत आहे.
2 / 6
ऑटोमोबाईल दिग्गज कंपनी मारुती सुझुकी WagonR हॅचबॅक कारवर 20,000 रुपयांची रोख सवलत देत आहे. याशिवाय, जर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना 15,000 रुपये एक्सचेंज बोनस म्हणून दिले जात आहेत. तसंच कॉर्पोरेट सूट म्हणून अतिरिक्त 6,000 रुपयांची सूट देण्यात येतेय.
3 / 6
ग्राहक या कारच्या ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिअंट्सवर एकूण 41,000 रुपयांची सूट घेऊ शकतात. त्यामुळे, एक्सचेंज ऑफरचा लाभ घेणाऱ्यांसाठी एकूण सवलत रुपये 40,000 आणि इतर ग्राहकांसाठी ही सवलत 25,000 रुपये आहे.
4 / 6
तर, इतर दोन मॅन्युअल व्हेरिअंट LXi आणि VXi वर एकूण 31,000 रुपयांची सूट मिळत आहे. तर, वॅगन आरच्या AMT व्हर्जनवर एकूण 21,000 रुपयांची सूट देण्यात येतेय आणि त्याच्या CNG व्हेरिअंटवर एकूण 40,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
5 / 6
मारुती सुझुकी वॅगनआर 1 लिटर युनिट आणि 1.2-लिटर युनिट अशा दोन पर्यायांसह उपलब्ध आहे. जेथे 1-लिटर इंजिन 67 PS पॉवर आणि 89Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर 1.2-लिटर इंजिन 90 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहेत. या कारचे CNG मॉडेल देखील उपलब्ध आहे, जे 34 kmpl पर्यंत मायलेज देते.
6 / 6
मारुती सुझुकीने या हॅचबॅकमध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, चार स्पीकर असलेली म्युझिक सिस्टीम, फोन कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ असे अनेक फीचर्स दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन), ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम), रिअर पार्किंग सेन्सर्स, हिल होल्ड असिस्ट सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकार