आता 6 लाखांच्या कारमध्ये मिळणार 6 एअरबॅग्ज; भारताची आवडती कार बनली आणखी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:08 IST
1 / 6 Maruti Suzuki WagonR : भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती सुझुकी WagonR आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. मारुती वॅगनआरच्या प्रत्येक मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्ज मिळणार आहेत. यामुळे गाडीची सुरक्षितता आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या 4 आर्थिक वर्षांपासून मारुती वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक होणारी कार आहे.2 / 6 मारुती वॅगनआर खरेदीदारांसाठी सुरक्षितता, ही एक मोठी चिंता होती. परंतु आता 6 एअरबॅग्जमुळे कारची सुरक्षितता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. 6 एअरबॅग्ज व्यतिरिक्त वॅगनआरमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि हिल होल्ड असिस्ट सारखी सुरक्षा वैशिष्ट्येदेखील मिळणार आहेत. 3 / 6 इंजिन आणि मायलेज- वॅगनआरमध्ये 2 इंजिन पर्याय आहेत. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मिळते. 1 लिटर इंजिनसह CNG चा पर्यायदेखील आहे. 1.0 लिटर इंजिन सुमारे 65 बीएचपी आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करते.4 / 6 याशिवाय, 1.2 लिटर इंजिन 88 बीएचपी आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार मॅन्युअल आणि एएमटीसह खरेदी करता येईल. याचे पेट्रोल मॉडेल 24 किमी अन् सीएनजी मॉडेल 34 किमी मायलेज देते.5 / 6 मारुती वॅगनआर वैशिष्ट्ये- मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये स्प्लिट सीट्स, ड्युअल-टोन इंटीरियर, टिल्ट स्टीअरिंग, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, रियर पार्सल ट्रे, एसी आणि हीटरसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. 2022, 2023, 2024 आणि 2025 ही सलग चार आर्थिक वर्षे वॅगनआर सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. 6 / 6 सुरुवातीला, वॅगनआरला त्याच्या बॉक्सी डिझाइनमुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण, नवीन अपडेट्समुळे ही कार आता अधिक उत्कृष्ट बनली आहे. मारुती सुझुकी वॅगन आर ची किंमत ₹5.64 लाख ते ₹7.47 लाख(एक्स-शोरुम) पर्यंत आहे. याचे बेस मॉडेल (LXI) ची किंमत ₹5.64 लाख आणि टॉप मॉडेल (ZXI Plus AT Dual Tone) ची किंमत ₹7.47 लाख आहे.