शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti पुन्हा लाँच करणार आपली सर्वात स्वस्त गाडी, पाहा कोणती आहे ही कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 5:54 PM

1 / 7
Maruti Suzuki पुन्हा Alto K10 नवीन रूपात सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीकडून ही कार मार्च 2020 मध्ये बंद करण्यात आली होती. सध्या या कारचे कोडनेम Y0M आहे. एंट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपल्याला आणखी मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे.
2 / 7
Maruti Suzuki पुन्हा Alto K10 नवीन रूपात सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीकडून ही कार मार्च 2020 मध्ये बंद करण्यात आली होती. सध्या या कारचे कोडनेम Y0M आहे. एंट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपल्याला आणखी मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे.
3 / 7
S&P ग्लोबल मोबिलिटीचे लाइट व्हेईकल फोरकास्टिंगचे सहयोगी संचालक गौरव वंगाल यांनी एका खाजगी वृत्तपत्राला सांगितले की, एंट्री-लेव्हल हॅचबॅकचा सध्याचा बाजार हिस्सा 7.8 टक्के आहे जो नवीन मॉडेल आणण्यासाठी पुरेसा मोठा आहे.
4 / 7
आर्थिक वर्ष 22 मध्ये, मारुती सुझुकीने Alto आणि S-Presso च्या 211,762 युनिट्सची विक्री केली आणि Renault ने Kwid ची 26,535 युनिट्स विकली. यामुळे एन्ट्री-लेव्हल हॅचबॅकसाठी 250,000 वाहनांची मजबूत बाजारपेठ निर्माण झाली.
5 / 7
जवळपास 20 वर्षांत 4.3 दशलक्ष वाहनांसह, विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी अल्टो ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. 2000 मध्ये लाँच झालेली, अल्टोचे पहिले जनरेशन 2012 पर्यंत सुरू होते. या कालावधीदरम्यान कारच्या 1.8 दशलक्ष युनिट्सची विक्री झाली.
6 / 7
त्यावेळी ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होती. 2005 मध्ये, अल्टोने भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून मारुती 800 ला मागे टाकले. या गाडीनं आपले हे स्थान 2018 पर्यंत कायम ठेवले होते.
7 / 7
Alto K10 कंपनीने 2010 मध्ये लॉन्च केली होती. या कारमध्ये कंपनीनं 998-cc इंजिन दिले होते. परंतु मार्च 2020 मध्ये कंपनीनं ही कार बंद केली. बंद होईपर्यंत कारच्या 880,000 युनिट्सची विक्री करण्यात आली होती.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत