शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाँच होताच Maruti च्या परवडणाऱ्या SUV चा बोलबाला! डिलिव्हरीसाठी पाहावी लागेल इतक्या महिन्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 12:50 PM

1 / 9
मारुती सुझुकीनं सोमवारी बाजारात आपली नवीन सब-फोर मीटर कॉम्पॅक्ट SUV Maruti Fronx लाँच केली. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिननं सज्ज असलेल्या या कारची किंमत 7.46 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
2 / 9
कंपनीनं Maruti Fronx लाँच होण्यापूर्वीच त्याचं बुकिंग सुरू केलं होतं. या कारला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आलीये. रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 23,000 हून अधिक युनिट्सचं बुकिंग झालं आहे.
3 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीनं 18 एप्रिल रोजी ही एसयूव्ही डीलरशिपला देणं सुरू केलं. जेणेकरून ग्राहक ही एसयूव्ही जवळून पाहू शकतील आणि ती खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतील.
4 / 9
असं सांगितले जात आहे की या कारचा वेटिंग पीरिअड देखील एक ते दोन महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. निरनिराळ्या व्हेरिअंटसाठी हा वेटिंग पीरिअड निरनिराळा आहे. भारतीय बाजारपेठेत कंपनीनं ऑफर केलेल्या सर्वात स्वस्त एसयूव्हींपैकी ही एक आहे.
5 / 9
मारुती ब्रेझाच्या तुलनेत या एसयूव्हीच्या किमतीत सुमारे 83 हजार रुपयांचा फरक आहे. Maruti Brezza ची किंमत 8.29 लाख रुपये आणि Fronx ची किंमत 7.46 लाख रुपयांपासून सुरू होते. दरम्यान, कंपनी ब्रेझाची विक्री एरिना शोरूम आणि फ्रॉन्क्सची तिच्या प्रीमियम नेक्सा डीलरशिपद्वारे करते. बाजारात ही नवीन एसयूव्ही प्रामुख्यानं टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सॉनेट सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते.
6 / 9
नवीन मारुती फ्रॉन्क्स कंपनीच्या दोन पेट्रोल इंजिन व्हेरिअंट्ससह सादर करण्यात आली आहे. ही 1.0 टर्बो-पेट्रोल आणि 1.2 पेट्रोल इंजिनसह येते. ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन गिअरबॉक्ससह ऑफर केली जात आहे.
7 / 9
कारचे टर्बो पेट्रोल इंजिन 100 पीएस पॉवर आणि 147Nm टॉर्क जनरेट करते. तर नॅचरली एस्पिरेटेड के-सिरीज इंजिन 89.73 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. ही SUV 5-स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे.
8 / 9
या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंगसह 9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. सुरक्षेच्या दृष्टीने, SUV मध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX अँकर आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशनसह (EBD) देण्यात आली आहे.
9 / 9
या कारचे 1.2 लीटर पेट्रोल व्हेरिएंट 21.79 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देईल. त्याच वेळी, त्याचे 1.0 लीटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल वेरिएंट 21.5 किलोमीटर प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 20.01 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकार