Maruti XL6 Launch: Maruti Suzuki Launches New Model of XL6 with Luxury Features
Maruti XL6 Launch: मारुतीचा मोठा धमाका, लक्झरी फीचर्ससह XL6 चे नवीन मॉडेल लॉन्च; किंमत फक्त... By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 3:11 PM1 / 10 मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या मारुती XL6 चे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनीकडून या नवीन कारमध्ये अनेक लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. या 6 सीटर कारमध्ये असे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत, जे यापूर्वीच्या मॉडेलमध्ये नव्हते. एक्सटेरियर आणि इंटीरियरच्या नवीन बदलासह कंपनीने याची बेस प्राइस 11.29 लाख रुपये ठेवली आहे.2 / 10 कंपनीने या XL6 चे नवीन मॉडेल 4 व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे. यामध्ये Zeta च्या मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेलची सर्वात कमी किंमत (11.29 लाख रुपये) आहे. तर त्याच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 12.79 लाख रुपये आहे. याशिवाय या कारला, अल्फा, अल्फा+ आणि अल्फा+ ड्युअल टोनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारची कमाल एक्स-शोरूम किंमत 14.55 लाख रुपये आहे.3 / 10 कंपनीने मारुती XL6 च्या फ्रंट ग्रिलला स्पोर्टी लूक दिला आहे. तर, एक्सटेरिअर लूकला आकर्षक बनवण्यासाठी एक्स्ट्रा क्रोम फिनिशीं दिली आहे. या कारमध्ये 16 इंच ड्युअल टोन व्हील आहेत. तसेच कारच्या बाजूला आणि मागील बाजूस क्रोम टच वाढवण्यात आला आहे.4 / 10 मारुती XL6 ची केबिन त्याचे खास आकर्षण रिहिली आहे. कंपनीने यावेळीही कारमध्ये प्रीमियम केबिन बनवले आहे. आधीप्रमाणेच ही प्रशस्त आहे. डॅशबोर्डला स्टोन फिनिशिंग देण्यात आले आहे. तर दारापासून पॅनलपर्यंत सिल्व्हर लाइनिंग लूक देण्यात आला आहे. 5 / 10 कारमध्ये 7-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, जी SmartPlay सह येते. तर, अनेक कंट्रोल्स स्टीयरिंग व्हीलवर दिली आहेत. कारच्या स्पीडोमीटरच्या मध्यभागी एक लहान टीएफटी स्क्रीन देखील देण्यात आली आहे.6 / 10 कंपनीने मारुती XL6 मध्ये पहिल्यांदाच व्हेंटीलेटेड सीट्स दिले आहेत. या कारचा ड्रायव्हर आणि पुढील प्रवासी सीट व्हेंटीलेटेड असेल. भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे ग्राहक बऱ्याच काळापासून व्हेंटीलेटेड आसनांची मागणी करत होते. 7 / 10 नवीन मारुती XL6 मध्ये कंपनीने 1.5-लीटर पेट्रोल K15 ड्युअल जेट इंजिन दिले आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल. हे 103 bhp कमाल पॉवर आणि 138Nm पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीचा दावा आहे की नवीन के-सीरीज इंजिन 11.2% कमी कार्बन उत्सर्जन करते.8 / 10 नवीन मारुती XL6 मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत, तसेच सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे. मानक मॉडेलमध्ये ड्युअल एअरबॅग्ज येतील. कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, चाइल्ड सेफ्टी माउंट, एबीएस, पादचारी शोध यंत्रणा यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.9 / 10 Android Auto आणि Apple CarPlay सारखी Car Connect वैशिष्ट्ये देखील आहेत. कारमध्ये 40 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय वायरलेस चार्जिंग, सुझुकी कनेक्ट टेलिमॅटिक्स, ऑटो एअर कंडिशन, अतिरिक्त बूट स्पेस, फोल्डेबल थर्ड-रो सीट आणि ऑटो ORVM देखील प्रदान करण्यात आले आहेत. 10 / 10 Android Auto आणि Apple CarPlay सारखी Car Connect वैशिष्ट्ये देखील आहेत. कारमध्ये 40 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय वायरलेस चार्जिंग, सुझुकी कनेक्ट टेलिमॅटिक्स, ऑटो एअर कंडिशन, अतिरिक्त बूट स्पेस, फोल्डेबल थर्ड-रो सीट आणि ऑटो ORVM देखील प्रदान करण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications