Mercedes amg e 53 4matic cabriolet launched in india know about the specifications and price
9 गिअर असलेली ही सुंदर कार लॉन्च, लुक आणि फीचर्सपाहूनच प्रेमात पडाल! पाहा PHOTO By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 12:06 PM1 / 6Mercedes-Benz India ने भारतात 9th AMG model, मर्सिडीज-एएमजी ई 53 4मॅटिक+ कॅब्रियोलेट लॉन्च केली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 1.30 कोटी रुपये एवढी आहे. भारतात जर्मन मार्कद्वारे विकले जाणारे हे एकमेव ओपन-टॉप कॅब्रिओलेट आहे. 3.0-लिटर सिलिंडर असलेले ही कार 435 bhp पॉवर जनरेट करते.2 / 6Mercedes-AMG E 53 Cabriolet चे एक्स्टिरिअर अत्यंत जबरदस्त आहे. यात AMG ग्रिल, AMG अलॉय व्हील, लिप स्पॉइलर आणि एक क्वाड-टिप एक्झॉस्ट सेटअपचाही समावेश आहे. याशिवाय Mercedes-AMG E 53 4MATIC+ च्या तुलनेत, हिला दोन-दरवाजा लेआउट आणि एक कन्व्हर्टेबल टॉप आहे.3 / 6केबिनमध्ये, ई 53 कॅब्रियोलेट ई 53 सेडान प्रमाणे सेटअप करण्यात आला आहे. एक ट्विन-डिस्प्ले इंफोटेनमेंट आणि इंस्ट्रूमेंट पॅनल कॉन्फिग्रेशन आहे. याच बरोबर एक विंड डिफ्लेक्टर, एएमजी ट्रॅक पेस ट्रॅक मॅनेजमेंट सिस्टिम, 64-कलर एम्बिएंट लायटिंग, एलईडी हेडलॅम्प्स, एएमजी सीट्स, एएमजी परफॉर्मन्स स्टेअरिंग, बर्मेस्टर सराउंड साउंड सिस्टिम सारखे अनेक जबरदस्त फीचर्स आहेत.4 / 6E 53 AMG मध्ये 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड इनलाइन 6 सिलिंडरचा वापर करण्यात आला आहे. जे 435bhp आणि 520Nm टार्क जनरेट करते. विशेष म्हणजे हे इंटीग्रेटेड जनरेटरने जोडले गेलेले आहे. जे 21bhp आणि 250Nm टार्क जनरेट करते.5 / 6या कारमध्ये 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा वापर करण्यात आला आहे. 4MATIC+ पुर्णपणे व्हेरिएबल AWD सिस्टिमच्या माध्यमाने सर्वच्या सर्व चारही चाकांना पॉवर पोहोचवली जाते. ही कार केवळ 4.6 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रति तासांचा वेग धारण करू शकते. याच बरोबर ती 250 किमी प्रति तास टॉप स्पीडपर्यंतही पोहोचू शकते.6 / 6या कारची एक्स शोरूम किंमत 1.30 कोटी रुपये एवढी आहे. मर्सिडीज-एएमजी ई 53 4मॅटिक+ कॅब्रिओलेट ई 53 एएमजीच्या तुलनेत थोडी महाग आहे. हिची एक्स-शोरूम किंमत 1.06 कोटी रुपये एवढी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications