mg astor suv officially unveiled gets ai adas autonomous level 2 know more features ai reliance jio
MG ची नवी SUV Astor झाली लाँच; आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससह मिळणार अॅडव्हान्स्ड फीचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 5:02 PM1 / 10MG Motor India नं भारतीय बाजारपेठेत आपला पोर्टफोलिओ अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं बुधवारी भारतीय बाजारपेठेत आपली नवी एसयूव्ही MG Astor लाँच केली. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि ऑटोनॉमस लेव्हल 2 ड्रायव्हर असिस्टंट सिस्टमसह असलेल्या या एसयुव्हीची विक्री सप्टेंबर महिन्यापासून केली जाणार आहे.2 / 10कंपनीनं नव्या MG Astor मध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सचा वापर केला आहे. जे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी ही कार लाँच केली जाईल तेव्हा ही देशातील सर्वात स्वस्त अशी कार असेल ज्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला असेल असा दावा कंपनीनं केला आहे. 3 / 10या नव्या एसयुव्हीची प्रमुख बाब म्हणजे MG नं यासाठी देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी Reliance Jio सोबत करार केला आहे. याचाच अर्थ या कारमधील AI साठी रिलायन्स जिओ IT सिस्टम उपलब्ध करून देणार आहे. 4 / 10रिलायन्स जिओ रिअल टाईम इन्फोटेन्मेंट आणि टेलिमॅटिक्ससाठी ई सीम आणि एलओटी तंत्रज्ञान पुरवणार आहे. ही नवी एसयुव्ही CAAP (कॉन्सेप्ट ऑफ कार अॅज ए प्लॅटफॉर्म) यावर बेस्ड असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 5 / 10कंपनीच्या सध्याच्या इलेक्ट्रीक एसयुव्ही मॉडेल ZS EV चंच पेट्रोल इंटर्नल कम्ब्युशन इंजिन (ICE) व्हर्जन आहे. यामध्ये कंपनीनं 1.5 लीटर क्षमतेच्या 4 सिलिंडर युक्त माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानानं युक्त अशा पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. 6 / 10हे पेट्रोल इंजिन 141bhp ची पॉवर आणि 240Nm चा टॉर्क जनरेट करतं. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असिस्टंट आणि सेगमेंटमधील पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 कार Astor च्या बद्दल एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी माहिती दिली. 7 / 10हे एसयुव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या अन्य मॉडेल्सच्या तुलनेत अधिक उत्तम आहे. याणध्ये काही अॅडव्हान्स्ड फीचर्स देण्यात आले आहेत, जे सध्या केवळ प्रीमिअम आणि लक्झरी सेगमेंटमध्येच मिळतात. ही एसयुव्ही ग्राहकांना एक स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंग एक्सपिरिअन्स देईल, असं चाबा म्हणाले.8 / 10MG Astor मध्ये एका विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यातील कॅमेरा ड्रायव्हिंगच्या वेळी निरनिराळ्या सुविधा पुरवणार आहे. यामध्ये अॅडप्टिव्ही क्रुझ कंट्रोल, लेन किपिंग असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमरजेन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, रिअर ड्राइव असिस्ट (RDA), लेन डिपार्चर प्रिवेंशन, इंटेलिजंट हेडलँप कंट्रोल (IHC) आणि स्पीड असिस्ट सिस्टम सारखे फीचर्स सामिल आहेत. 9 / 10स्मार्ट ड्राईव्ह AI तंत्रज्ञानाशिवाय या एसयूव्हीमध्ये LED लँप (फ्रन्ट आणि रिअर) आणि डे टाईम रनिंग लाईट, रुफ माऊंटेड स्पॉयलर अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.10 / 10याशिवाय ड्युअल टोन अलॉड व्हिल्स, आय स्मार्ट कनेक्टसोबत डिजिटल कन्सोल, 8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, सनरुफ आणि अन्य फीचर्सही देण्यात येत आहेत. ही एसयुव्ही ह्युंदाई क्रेटा आणि सेल्टॉस यांसारख्या मॉडेल्सना टक्कर देईल. आणखी वाचा Subscribe to Notifications