'MG Hector' launched in India; Cheaper than Tata's Harrier and fiat compass
‘एमजी हेक्टर’ भारतात लॉन्च; टाटाच्या हॅरिअरपेक्षाही स्वस्त By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 8:08 PM1 / 9एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर्स इंडियाने त्यांची पहिली एसयूव्ही एमजी हेक्टर आज लाँच केली. इंटरनेट कार असलेल्या या एसयुव्हीची किंमत टाटाच्या हॅरिअरपेक्षाही स्वस्त ठेवल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. 2 / 9भारताची पहिली इंटरनेट कार एमजी हेक्टर गेल्या महिन्यात दाखविण्यात आली होती. तसेच आगाऊ बुकिंगही सुरू करण्यात आले होते. मात्र, किंमत गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून या कारची डिलीव्हरी सुरू करण्यात येणार आहे.3 / 9हेक्टरसोबत ग्राहकांना 'एमजी शिल्ड' हे वाहन मालकीचे पॅकेज देण्यात येणार आहे. यामध्ये मालकांना अमर्याद किमी पाच वर्षांच्या काळासाठी वॉरंटी दिली जाणार आहे. 4 / 9अन्य वॉरंटीसह पाच सर्व्हिस मोफत देण्यात येणार आहेत. तसेच मेन्टेनन्स प्लॅनही देण्यात आले आहेत. 5 / 9आता पर्यंत कंपनीने 10 हजार बुकिंग नोंदविली आहेत. सध्या कंपनीची 120 आऊटलेट असून ती पुढील तीन महिन्यांत 250 करण्यात येणार आहेत. 6 / 9ही एसयुव्ही 11 प्रकारात मिळणार असून पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन सुपरची एक्स-शोरूम किंमत 12.18 लाख ठेवण्यात आली आहे. जी टाटाच्या हॅरिअरपेक्षा जवळपास 70 हजारांनी कमी आहे. 7 / 9पेट्रोल हायब्रिड कारची किंमत 13.58 लाखांपासून सुरू होते. पेट्रोलच्या अॅटोमॅटीक मॉडेलची किंमत 15.28 लाखांपासून सुरू होते. 8 / 9डिझेल एमटीची किंमत 13.18 लाख ते 16.88 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. 9 / 9हेक्टरची किंमत टाटा हॅरिअरपेक्षा 80 हजार, जीप कंपासपेक्षा तब्बल 3.5 लाखांनी कमी ठेवण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications