शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 5:18 PM

1 / 15
देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अद्यापही सार्वकालिक उच्चांकावर आहेत. त्यामुळे भारतीय ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त आहे. यात आताच्या घडीला TATA मोटर्स आघाडीवर आहे.
2 / 15
मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून ऑटोमोबाइल सेक्टर सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे वेगळ्या संकटाला तोंड देत आहे. यामुळे इच्छा आणि क्षमता असूनही ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देण्यास कंपन्यांना विलंब होत आहे.
3 / 15
यातच आता इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होणाऱ्या भारताच्या बाजारपेठेत MG Motor India नवीन इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. आगामी वर्षाच्या सुरुवातीला MG मोटर्स electric crossover कार लाँच करणार आहे.
4 / 15
MG जागतिक प्लॅटफॉर्मवर आधारित इलेक्ट्रिक कार भारतात आणेल पण ती भारतीय बाजारपेठेनुसार तयार केलेली असेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. आताच्या घडीला टाटा मोटर्सची नेक्सॉन ईव्ही ही सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.
5 / 15
एमजी मोटर्सही भारतात SUV ZS EV ची विक्री करते. ड्रायव्हिंग रेंजसोबतच या कारची किंमतही नेक्सॉनपेक्षा बरीच जास्त आहे. त्यामुळे आता नेक्सॉनला टक्कर देण्याचा एमजीचा प्रयत्न असणार आहे. या अपकमिंग इलेक्ट्रिक कारची किंमत १० ते १५ लाख रुपयांपर्यंत असेल.
6 / 15
SUV Astor नंतर, आम्ही एका इलेक्ट्रिक वाहनाबाबत विचार करत आहोत, आणि आता सरकारने इलेक्ट्रिक वाहनांबाबत काही बाबी स्पष्ट केल्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले आहे. आम्ही पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारतात ईव्ही सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 / 15
या कारची किंमत १० ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान असेल. यासंदर्भात एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी माहिती दिली. भारतात एमजी मोटर सध्या इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये SUV ZS EV ही एकमेव इलेक्ट्रिक कार विकते.
8 / 15
या कारची एक्स-शोरुम किंमत २१ लाख रुपये ते २४.६८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. एका चार्जिंगमध्ये ही कार ४१९ किमीपर्यंत दमदार ड्रायव्हिंग रेंज देते. आगामी इलेक्ट्रिक कार नेक्सॉन ईव्हीप्रमाणेच ३०० किमीपर्यंतच्या ड्रायव्हिंग रेंजसह येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
9 / 15
दरम्यान, Tata मोटर्सने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आघाडी कायम ठेवली असून, टाटा मोटर्स कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तब्बल ३२४ टक्क्यांनी वाढली आहे.
10 / 15
नोव्हेंबर २०२० मध्ये Tata मोटर्सने केवळ ४१३ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. तर गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपनीने एकूण १,७५१ इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. विक्रीचा हा आकडा कमी वाटत असला तरी ईव्ही मार्केटमध्ये टाटा अव्वल असून वार्षिक आधारावर ३२४ टक्के वाढ नोंदवली आहे.
11 / 15
गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटाने १,५८६ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. तर सप्टेंबर महिन्यात कंपनीने १,०८७ इलेक्ट्रिक कारची विक्री केली होती. Tata Nexon EV इलेक्ट्रिकला भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे.
12 / 15
याशिवाय टाटा टिगोर ईव्हीची (Tata Tigor EV) मागणीही वाढत आहे. पण दोन्हीपैकी कोणत्या कारची किती विक्री झालीय याबाबत मात्र माहिती कंपनीने दिलेली नाही. तथापि, लाँच झाल्यापासूनच Nexon EV ही भारतातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार आहे.
13 / 15
विशेष म्हणजे चिपच्या संकटामुळे सर्वच कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असतानाही टाटाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. दरम्यान, सेमीकंडक्टर क्षेत्रातही चीनची मक्तेदारी आहे. याच क्षेत्रात आता TATA ने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
14 / 15
TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. टाटा समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती.
15 / 15
TATA ग्रुपची आउटसोर्स्ड सेमीकडंक्टर असेंबली प्रकल्पासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा सुरू आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. सेमीकंडक्टर म्हणजे एक प्रकारच्या सिलिकॉन चिप्स आहेत.
टॅग्स :TataटाटाMG Motersएमजी मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन