mumbai festival vintage car rally and cm uddhav thackeray casual look
मुंबईत 'व्हिंटेज कार'चा थाट...रॉयल फेरफटका अन् मुख्यमंत्री ठाकरेंचा 'कॅज्युअल लूक' By मोरेश्वर येरम | Published: January 31, 2021 11:53 AM1 / 7व्हिंटेज कारबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असतं. अशाच दुर्मिळ कार आज मुंबईच्या रस्त्यावर धावताना पाहायला मिळाल्या. 'मुंबई फेस्टीव्हल'च्या अंतर्गत आज मुंबईत व्हिंटेज कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.2 / 7राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिंटेज कार रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.3 / 7उद्धव ठाकरे यांना कारची आवड आहे. ड्राइव्हर सोबत न घेता त्यांना स्वत: कार चालवताना आपण बहुतेकवेळा पाहिलं आहे. त्यांनी 'व्हिंटेज कार रॅली'मध्ये सामील झालेल्या कारची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी 'कॅज्युअल लूक'मध्ये पाहायला मिळाले. 4 / 7'व्हिंटेज कार'सोबतच या रॅलीमध्ये १०० व्हिंटेज बाइक देखील सामील झाल्या होत्या. 5 / 7मुंबईतील बीकेसी ते बॅलार्ड इस्टेट दरम्यान या व्हिंटेज ड्राइव्ह रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत तब्बल ७० ते ८० वर्ष जुन्या दुर्मिळ कार मुंबईच्या रस्त्यावर धावल्या.6 / 7व्हिंटेज कार रॅलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एका दुर्मिळ आणि आलिशान कारमध्ये बसून फेरफटका मारला.7 / 7मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण फॉर्मल वेअर लूकमध्ये अनेकदा पाहिलं आहे. पण यावेळी व्हिंटेज कार रॅलीच्या आलिशान थाटाला शोभेल अशा कॅज्युअल लूकमध्ये ते पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी जांभळ्या रंगाचं उठावदार असं चेक्स शर्ट परिधान केलं होतं. व्हिंटेज कारसोबतच मुख्यमंत्र्यांच्या या हटके लूकनंही फोटोग्राफर्सचं लक्ष वेधून घेतलं. आणखी वाचा Subscribe to Notifications