शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BYD Atto 3 Electric SUV: मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये! एसयुव्हींच्या बादशाह कंपनीने टाटालाही मागे टाकले, EV कार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 2:00 PM

1 / 7
बिल्ड युवर ड्रीम (BYD) ने आज भारतात दुसरी ईलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच केली आहे. BYD Atto 3 चा आकर्षक लुक आणि दमदार इलेक्ट्रीक मोटरवाल्या का कारची किंमत 33.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बीवायडी ही चीनची कंपनी आहे. कोरोना काळापासून ही कंपनी भारतात यायचे प्रयत्न करत होती, आता तिने दुसरे पाऊल ठेवले आहे. या कारला आतापर्यंत 1,500 बुकिंग मिळाले आहे.
2 / 7
कंपनीने ११ ऑक्टोबरला या एसयुव्हीची बुकिंग सुरु केली होती. ही पाच सीटर एसयुव्ही असून चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये बोल्डर ग्रे, पार्कर रेड, स्काय व्हाइट आणि सर्फ ब्लू हे रंग असणार आहेत. बीवायडीची ही दुसरी कार आहे, यापूर्वी कंपनीने E6 इलेक्ट्रिक एमपीवी भारतीय बाजारात आणली होती. याची किंमत 29.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
3 / 7
Atto 3 मध्ये कंपनीने ब्लेड बॅटरी टेक्नोलॉजी वापरलेली आहे. यामध्ये 60.48 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही एसयुव्ही 7.3 सेकंदांत 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडते. फुल चार्ज झाल्यावर एसयुव्ही 521 किलोमीटर पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. फास्ट DC चार्जरने केवळ ५० मिनिटांत बॅटरी ८० टक्के चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे.
4 / 7
ही एसयुव्ही एडवांस्ड टेक्नोलॉजी लेवल-2 ADAS ने लेस आहे. या तंत्रज्ञानाला BYD Dipilot नावाने देखील ओळखले जाते. या एसयुव्हीत 7 एअरबॅग, पैनोरमिक सनरूफ, 12.8 इंच ट्चस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, एडॉप्टिव रोटेटिंग फंक्शन, 360-डिग्री होलोग्रॉफिक ट्रांसपैरेंट इमैजिंग सिस्टम, व्हीकल टू लोड (VLOT) मोबाइल पावर स्टेशन, वायरलेस चार्जिंग, वन-ट्च इलेक्ट्रिक टेलगेट, 8 स्पीकर आणि व्हॉईस कंट्रोल देण्यात आला आहे.
5 / 7
मागे पुढे दोन्ही बाजुला एलईडी लाईट देण्य़ात आली आहे. 18-इंच डुअल-टोन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. आतमध्ये 12.8 इंच का रोटेटिंग सेंट्रल स्क्रीन, 5.0 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मल्टी कलर एम्बीएंट लाइटिंग, पीएम 2.5 एयर फिल्टर, सिंथेटिक लेदर अपहोल्स्ट्री सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), ट्रैक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल देण्यात आले आहे.
6 / 7
यात दोन चार्जिंग ऑप्शन आहेत. 80kW DC फास्ट चार्जरद्वारे ५० मिनिटांत ८० टक्के बॅटरी चार्ज होते. 7kW च्या एसी चार्जरद्वारे फुल चार्जला १० तास लागतात. या चार्जरसोबत 3kW पोर्टेबल चार्जिंग बॉक्स देण्यात येत आहे, याद्वारे तुम्ही अन्य इलेक्ट्रिकल अप्लाइंसेस देखील वापरू शकणार आहात.
7 / 7
कंपनी कारसोबत तीन वर्षांचे मोफत 4G डाटा सब्सक्रिप्शन देत आहे. सहा वर्षांसाठी रोड साईड असिस्टंस, ६ फ्री मेंटेनन्स सर्व्हिस देण्यात येणार आहेत. बॅटरीसाठी ८ वर्षे किंवा १.६ लाख किमी आणि इलेक्ट्रीक मोटरसाठी ८ वर्षे किंवा दीड लाख किमीची वॉरंटी देण्यात येत आहे. जानेवारीपासून या कारची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर