शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Car Buying Calculator: यंदा दिवाळीत कार घेऊ का? आधी गणित घातलेय का? या पंचसुत्रीचा जरूर विचार करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 10:00 AM

1 / 9
मुलं फार मागे लागली आहेत की, कार घ्या. कार लोन स्वस्त आहे, मित्रमंडळीही सांगतात, लोन घेऊन कार घेऊन टाक, इझी होईल.. सगळ्यांकडे गाड्या आहेत, आपण घ्यावी असं वाटतं आहे. काय करू, असं सध्या काहीजण विचारतात.
2 / 9
काहीजण आपली जुनी कार विकून नवी घेऊ का म्हणतात. तर याचं सोपं उत्तर म्हणजे तुमच्या खिशात कार घेण्याइतपत भरपूर पैसे असते तर तुम्ही हा प्रश्न कुणाला विचारलाच नसता, घेऊन टाकली असती जी आवडेल ती कार! आता आपण कर्ज काढून कार घेणार तर मग त्याचा विचार करावा लागतो.
3 / 9
त्यासाठी मी ही काही सूत्रं सांगतो. त्याची उत्तरं तुमची तुम्ही द्या. आणि मग कार घ्यायची का, कोणती घ्यायची, बजेट काय, गरज काय, कर्ज किती घेणार हे ठरवा.
4 / 9
अनेकजण सांगतात की झिरो डाऊनपेमेंटवर पण हल्ली काम होतं. किरकोळ रक्कम भरली तरी बाकी सगळं कर्ज मिळतं. तुमचा फॉर्म १६ चांगला असेल तर कर्ज सहज मिळतं हे खरं. पण एक लक्षात ठेवायचं की आपली डाऊनपेमेंट रक्कम जितकी मोठी तितकी आपल्याला कार डील चांगली मिळते आणि कर्जाची डीलपण. त्यामुळे बँकेचा कर्मचारी किंवा मॅनेजर किती कर्ज देतो आहे यापेक्षा डाऊनपेमेंट आपण किती करु शकतो हे स्वत:ला विचारा.
5 / 9
तुमच्या शहरात आज पेट्रोल/डिझेल काय भाव आहे? पेट्रोलवर होणारा खर्च दरमहा तुमच्या खर्चात वाढ करणार आहे. म्हणजे ईएमआय पेट्रोल खर्च हा वाढता खर्च खिशाला झेपणार आहे का?
6 / 9
३. इन्शुरन्सचा खर्च या खर्चात जमा करा. तो वर्षातून एकदा भरला तरी दरमहा खिशावर किती भार पडला याची नोंद ठेवलेली बरी.
7 / 9
४. तुम्हाला कार चालवता येते का? नसेल येत तर ड्रायव्हर पगारी ठेवावा लागेल किंवा कार चालवणं शिकावं लागेल, तो खर्च यादीत लिहून घ्या.
8 / 9
५. आणि हा सारा विचार करुन ‘थंब रुल’ म्हणून एक सूत्र घ्या. ईएमआय, पेट्रोल खर्च, इन्श्युरन्स, कार धुण्याचा खर्च, मेंटेनन्स खर्च.. हा सारा खर्च दरमहा किती रुपये होतो हे मोजा. म्हणजे सूत्र हे की ३०% इंधन खर्च ईएमआय.
9 / 9
उदा. ५००० रुपये हप्ता, ४००० रुपये पेट्रोल, इन्शुरन्स, गाडी धुणे हा किमान खर्च दरमहा. आता मोजा कार केवढ्याला पडली. आपल्या फायद्याचं गणित असेल तर गाडी घेऊ का या प्रश्नाचं उत्तर मिळेल.. (पी. व्ही. सुब्रमण्यम, लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)
टॅग्स :carकार