शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fortuner : नव्या लूकमध्ये येतेय फॉर्च्युनर, 'हे' फिचर्स बनवणार दमदार; पाहा कधी होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 4:16 PM

1 / 7
जपानची मोटार कंपनी टोयोटा (Toyota) आपली दमदार एसयूव्ही फॉर्च्युनर (Fortuner) नव्या लूकमध्ये आणणार आहे. येत्या काही महिन्यांत कंपनी फॉर्च्युनरला जागतिक बाजारपेठेत सादर करू शकते. यानंतर, पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत नवीन फॉर्च्युनर-2023 ची एंन्ट्री अपेक्षित आहे. सध्या टोयोटा भारतीय बाजारपेठेत अर्बन क्रुझर हाय रायडर लाँच करण्याच्या तयारीत आहे. यानंतर कंपनी नवीन फॉर्च्युनर बाजारात आणू शकते. मात्र, टोयोटाने थायलंडमध्ये लीडर मॉडेल सादर केले आहे.
2 / 7
नवीन मॉडेल नवीन इंजिन पर्यायासह अगदी नवीन डिझाइन आणि अपग्रेड केबिनसह येईल. जपानची मोटर कंपनी टोयोटा भारतीय बाजारपेठेत प्रत्येक सेगमेंटमध्ये ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. फॉर्च्युनरचे अपडेटेड व्हेरियंट भारतात 2015 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आले होते. GR-S आणि Legendre 4×4 सारखे व्हेरियंट आल्याने 7 सीटर रेंजमध्येही अपडेट दिसून आले होते.
3 / 7
न्यू जनरेशन टोयोटा फॉर्च्युनरच्या डिझाईनमध्ये थोडे बदल पाहायला मिळू शकतात. कंपनी आपला फ्रंट लूक सध्याच्या वेरिएंटपेक्षा थोडा वेगळा बनवू शकते. नवीन फॉर्च्युनरमध्ये 2.8-लिटर GS सीरिज डिझेल इंजिन हायब्रिड तंत्रज्ञानासह जोडले जाऊ शकते. कंपनी त्याच्या इंटीरियरमध्येही बदल करण्याची शक्यता आहे.
4 / 7
समोर आलेल्या काही वृत्तांनुसार, नवीन फॉर्च्युनरमध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा, ADAS आणि उत्तम सेफ्टी फीचर्स मिळू शकतात. कंपनी रिडिझाइन केलेला डॅशबोर्ड देऊ शकते. याशिवाय बिग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम सारखे फीचर्सही मिळू शकतात.
5 / 7
कंपनी याला स्टायलिस्ट लूक देण्यासाठी एक मोठा ग्रीनहाऊस, मोठा क्वार्टर ग्लास, ग्रे फिनिश असलेली रुफ रेल जोडली जाऊ शकते. नव्या मॉडेलमध्ये एक इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर मिळण्याचीही शक्यता आहे.
6 / 7
यू जनरेशन टोयोटा फॉर्च्युनरमध्ये स्किड प्लेट, रेक्ड फ्रन्ड विंडशिल्ड, क्रोम विंडो लाईनसह 18 इंचाचे अलॉय व्हिल्सही पाहायला मिळू शकतात. याशिवाय यात एलईडी हेडलाईट्स, जीआर फ्रन्ट, रिअर बम्पर आणि फ्रन्ट, साईड लोगो मिळेल.
7 / 7
गेल्या वर्षाच्या अखेरिस टोयोटानं फॉर्च्युनरच्या लाईनअपमध्ये 4*4 एडिशन सादर केली होती. कंपनीनं नुकतंच आपल्या या एसयुव्हीच्या किंमतीत वाढ केली होती. सध्या भारतात या एसयुव्हीचे आठ व्हेरिअंट उपलब्ध आहेत. 7 सीटर फॉर्च्युनरमध्ये 2755 सीसीपर्यंतचं इंजिन देण्यात आलंय. हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
टॅग्स :Toyotaटोयोटा