शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठ्या कुटुंबासाठी आली नवी Toyota Rumion कार; ७ सीटर, २६ किमी रेंज अन् किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 3:28 PM

1 / 11
Toyota नं अखेर भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त ७ सीटर कार Toyota Rumion लॉन्च केली आहे. दिर्घकाळापासून याची चर्चा सुरू होती. टोयोटाची नवी कार मारुती सुझुकीची प्रसिद्ध Maruti Ertiga सारखीच आहे.
2 / 11
टोयोटाने ही कार लॉन्च केली असली तरी अधिकृतपणे तिची किंमत आणि बुकिंग याबद्दल माहिती जाहीर केली नाही. सध्या ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त ७ सीटर कार असेल. या कारनंतर टोयोटाकडे सर्वात मोठा एमपीवी रेंज असेल. इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस, वेलफायर आणि आता रुमियन सहभागी झालीय.
3 / 11
बलेनो बेस्ड ग्लांजासारखी मारुती अर्टिगावर बेस्ड ही MPV बनवण्याची आणि पुरवठा करण्याची जबाबदारी मारुती सुझुकीकडे असेल. परंतु या कारमध्ये थोडे बदल नक्कीच करण्यात आलेत ज्यामुळे ही कार Maruti Ertiga पेक्षा वेगळी असेल.
4 / 11
कसी असेल टोयोटा रुमियन – न्यू टोयोटा रुमियन ही कम्फर्ट, फिचर्ससह परफॉर्मेंस देणारी कुटुंबाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. ही कार मोठी केबिन आणि इंटिरियरसह आधुनिक फिचर्सने परिपूर्ण ग्राहकांना ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव देईल.
5 / 11
कंपनी या कारला पेट्रोल इंजिनसह नियो ड्राइव्ह आणि ई सीएनजी तंत्रज्ञानासह मार्केटमध्ये आणणार आहे. Toyota Rumion मध्ये कंपनीनं १.५ लीटर क्षमतेचे के सीरीज इंजिनचा वापर केला आहे जो अर्टिगासारखा सीएनजीचा पर्याय उपलब्ध होतो.
6 / 11
पेट्रोल मोडमध्ये ही कार ७५.८ किलोवॅट क्षमतेचं पॉवर आऊटपूट आणि १३६.८ टॉर्क जेनरेट करते. CNG मोडमध्ये ही ६४.६ KW पॉवर आणि १२५.५ NM चं टॉर्क जेनरेट करते. या इंजिनाला ५ स्पीड म्युनअल आणि ६ ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत जोडले आहे.
7 / 11
कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवी नियो ड्राईव्ह टेक्नोलॉजी आणि ई-सीएनजी तंत्रज्ञानाने कारचे माइलेज अधिक चांगले बनते. टोयोटाचा दावा आहे की, पेट्रोल व्हर्जनवर २०.५१ किमी प्रतिलीटर आणि CNG वर २६.११ किमी प्रतिलीटर माइलेज देईल.
8 / 11
ही कार पेट्रोल(नियो ड्राईव्ह) आणि सीएनजी या दोन्ही पर्यायात उपलब्ध होईल. Toyota Rumion मध्ये वायरलेस एंड्रॉईड, ऑटो आणि एप्पल कार प्लेसोबत १७.७८ सेमी स्मार्ट प्ले कास्ट टच स्क्रिन ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे.
9 / 11
टोयोटा आय कनेक्ट ५५ प्लस फिचर्ससोबत रिमोट क्लाइमेंट कंट्रोल, लॉक, अनलॉक, स्मार्टवॉट, त्याचसोबत वाहनाच्या दुरुस्तीबाबत कुठल्याही प्रकारची त्रुटी असल्यास अलर्ट सर्व्हिस कनेक्टसारखा फिचर्स देण्यात आला आहे. या कारची अंदाजित किंमत ८.७७ लाख एक्स शोरुम असण्याची शक्यता आहे.
10 / 11
त्याशिवाय ऑटो कोलाइजन नोटिफिकेशन, टो अलर्ट, फाइंड माय कार, पॅडल शिफ्टर्ससह ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि क्रुझ कंट्रोलसारखे फिचर्स मिळतील. ही कार मारुती सुझुकीची प्रसिद्ध हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
11 / 11
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डुअल फ्रंट आणि फ्रंट सीट साइड एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक्स ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशनसह एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इंजिन इमोबिलाइजर, सीट बेल्ट, रिमाइंडर, हायस्पीड अलर्ट सिस्टम, हिल होल्ड असिस्ट फोर्ससह फ्रंट सीट बेल्ट प्रीटेंशनर्ससारखे फिचर्स दिले आहेत.
टॅग्स :ToyotaटोयोटाMaruti Suzukiमारुती सुझुकी