शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Traffic Fines in Maharashtra: वाहतुकीचे नियम मोडाल तर याद राखा! आधी नवीन दंडाची रक्कम पहा, नाहीतर डोळे पांढरे होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 4:24 PM

1 / 9
2 / 9
काळ्या काचा, लायसन्स नसणे, विमा नसणे, नो पार्किंग, वेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे आदीची रक्कम एकदा पाहिलीत तर तुम्हाला अशा चुका करणे किंवा नियम मोडण्याची हिंमतही होणार नाही. काही शेमध्ये असलेली दंडाची रक्कम आता काही हजारात जाऊन पोहोचली आहे.
3 / 9
कारची काळी काच असेल तर पहिल्या वेळी 500 रुपयांचा दंड. पुन्हा काळी काच करून फिरताना सापडल्यास 1500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
4 / 9
विना हेल्मेट मोटरसायकल चालविताना दिसल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच लायसन्स तीन महिन्यांसाठी देखील सप्सेंड होणार आहे. म्हणजे आणखी 300-400 रुपये घातले तर त्यात नवे आयएसआय मार्कचे दर्जेदार हेल्मेट तुम्ही विकत घेऊ शकता आणि दंडापासून तसेच अपघातामध्ये डोक्याला मार लागण्यापासून वाचू शकता.
5 / 9
तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा विमा नसला तर पहिल्यावेळी 2000 रुपयांचा दंड आणि दुसऱ्यावेळी 4000 रुपयांचा दंड आकारण्य़ात येणार आहे.
6 / 9
जरी तुम्हाला पोलिसांनी थांबविले नाही, तरी देखील ते तुम्ही जात असताना पाठीमागून तुमच्या वाहनाचा फोटो काढतात, त्यातील नंबर स्कॅन केला जातो व तुमच्या वाहनाची सारी माहिती समोर येते. सावध व्हा आणि वेळीच विमा काढून घ्या.
7 / 9
बऱ्याचदा आपण वेगात असतो किंवा पोलीस थांबवत आहेत हे पाहून मुद्दाम पळून जातो. परंतू हा गुन्हा आहे. तुम्हाला वाटत असेल की पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालो, पण तसे नाही. तुमच्या गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो पोलिसांनी काढला तर तुम्हाला ऑनलाईन दंड बसतो.
8 / 9
पोलिसांनी हात दाखविला आणि तुम्ही न थांबता पळून गेलात तर अशी पहिली वेळ असेल तर 500 रुपयांची पावती फाडली जाईल. दुसऱ्यांदा असे केलात तर तुम्हाला तिप्पट दंड म्हणजेच 1500 रुपये भरावे लागणार आहेत.
9 / 9
आजकाल पोलीस सिग्नल किंवा अन्य ठिकाणी थांबून तुमच्या कारचा नंबर त्यांच्याकडील अॅपवर टाकतात. तुम्ही आधी कधी सिग्नल तोडला असेल किंवा विरुद्ध दिशेने दुचाकी चालविली किंवा विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहन चालवत असताना पकडले गेला असाल आणि दंड भरला नसेल तर ते तपासले जाते. ही दंडाची रक्कम थकीत असेल तर तात्काळ भरून घेतली जाते, जास्त दंडाची रक्कम असेल तर वाहन जप्त केले जाते. यामुळे वाहतुकीचे नियम मोडताना जरा विचार करा, पैसे आणि त्रासही वाचवा. (उर्वरीत नियम आणि दंड पुढील भागात)
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी