शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मस्तच! Royal Enfield घेऊन येतेय Classic 350 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:10 PM

1 / 10
नवी दिल्ली: Royal Enfield कंपनीने गेल्या काही वर्षात मोठी प्रगती केली आहे. धडधडणार आवाज आणि रेट्रो लूट ही या कंपनीच्या दुचाकींची वैशिष्ट्ये मानली जातात.
2 / 10
तरुणाईच्या मनावर Royal Enfield आजच्या घडीलाही अधिराज्य गाजवत आहे. धडाडणणार बुलेटचा आवाज आला की, लोकांच्या नजरा वळल्या नाहीत, असे होत नाही.
3 / 10
Royal Enfield ने आपल्या वाहनांची लोकप्रियता कायम राहावी, यासाठी नवनवीन गोष्टींची भर घालत असते. Classic 350 कंपनीची बेस्ट सेलिंग बाइक आहे.
4 / 10
Royal Enfield गेल्यावर्षी या बाइकला बीएस६ इंजिनसोबत सादर केले होते. आता कंपनी या बाइकचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे.
5 / 10
Classic 350 च्या रेट्रो लूकला ग्राहकांची मोठी पसंती आहे. Royal Enfield नवीन जनरेशनच्या मॉडेलमध्ये मीटियर ३५० मध्ये वापरलेल्या इंजिनचा वापर करू शकते.
6 / 10
Royal Enfield Classic 350 च्या नेक्स जनरेशन नवीन मॉडेलची लॉन्च डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र, काही चर्चांनुसार ही बाइक ऑगस्ट २०२१ या महिन्यात लॉन्च होईल, असे शक्यता वर्तवली जात आहे.
7 / 10
नवीन Classic 350 मध्ये सर्वांत मोठा बदल हा दमदार इंजिन असेल. कंपनी या बाइकमध्ये ३४९सीसीचे नवीन सिंगल सिलेंडर एयर कूलर लाँग स्ट्रोक इंजिन देऊ शकते.
8 / 10
या बाइकला ५ स्पीड गियरबॉक्ससोबत लाँच केले जाईल. नवीन क्लासिक ३५० मध्ये रायडिंगच्या वेळी जास्त वायब्रेशन होणार नाही व रायडिंग अनुभव चांगला होईल, असे सांगितले जात आहे.
9 / 10
तसेच नवीन Classic 350 मध्ये मीटियर ३५० प्रमाणेच Tripper Navigation system चा वापर करण्यात आलेला आहे. नवीन फिचर्समुळे रायडर स्मार्टफोनमध्ये Royal Enfield App डाउनलोड करून नेव्हिगेशनसह अन्य फीचर्सचा लाभ डिजिट इंस्ट्रूमेंटच्या मदतीने घेऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
10 / 10
रॉयल एनफिल्डची ही बाइक Honda H’Ness CB३५०, जावा, बेनेली यांसह या रेंजमधील अन्य बाइकला टक्कर देईल. तसेच या नव्या बाइकची किंमत १.७२ लाख ते १.९८ लाखांच्या घरात असेल, असा अंदाज आहे.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक