Nio launched an electric sedan ET5 EV With a range of 1000 km in a single charge
सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 3:51 PM1 / 9 वाढत्या इंधनाच्या दरामुळे मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पण, चार्जिंग पॉइंट आणि ड्रायविंग रेंजमुळे आजही अनेकजण या इलेक्ट्रीक वाहनांबद्दल साशंक आहेत.2 / 9 पण, आता या शंकेचे निरसन करण्यासाठी 'निओ' नावाची कंपनी पुढे आली आहे. चीनी ईव्ही निर्माता कंपनी निओने आपली दुसरी सर्व-इलेक्ट्रिक सेडान कार 'निओ ईटी 5' सादर केली आहे. 3 / 9 कंपनीने आपल्या वार्षिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी All Electric ET 5 सादर केली आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपासून ही कार फक्त चीनमध्ये उपलब्ध होईल.4 / 9 मिळालेल्या माहितीनुसार, या कारची सुरुवातीची किंमत 3,28,000 युआन (38,93,918 रुपये) ठेवण्यात आली आहे. एंट्री-लेव्हल टेस्ला मॉडेल 3 ची किंमत चीनमध्ये 30.36 लाख रुपये आहे.5 / 9 Neo ET 5 इलेक्ट्रिक सेडानमध्ये पुढील बाजूस 150kWh, तर मागील बाजूस 210kWh पॉवर देण्यात आली आहे. चालकाला एकूण 483 hp पॉवर आणि 700 Nm टॉर्क मिळतो. इंजिन 4.3 सेकंदात 0-100 किमीचा पल्ला गाठू शकते.6 / 9 कंपनीने इनहाऊस 4 पीस फिक्स्ड क्लिपर्स विकसित केले आहेत, जे अॅल्युमिनियम कास्टिंगसह येतात. ET5 रेंज चाचणीदरम्यान 75kWh बॅटरीवर 550 किमी ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.7 / 9 तर, लांब पल्ल्यासाठी 100kWh क्षमतेच्या बॅटरीसह 700 किमीची श्रेणी आणि 150kWh क्षमतेच्या बॅटरीसह 1000 किमीची रेंज मिळवता येते.8 / 9 तंत्रज्ञानामध्ये यात 10.2-इंचाचा HDR डिस्प्ले आहे, जो कारच्या डॅशबोर्डच्या मध्यभागी आहे. या प्रणालीमध्ये एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.9 / 9 या इलेक्ट्रीक सेडानची टक्कर टेस्लाच्या एंट्री लेव्हल मॉडेल 3 शी असेल. ही कार चीनमध्ये पुढील वर्षी उपलब्ध होणार आहे. भारतात ही गाडी कधी मिळेल याची अद्याप माहिती नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications