शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दरडींचा धोकादायक अणुस्कुरा घाट अन् Nissan Magnite AMT; 1200 किमींची कोकणात भ्रमंती, कशी वाटली...

By हेमंत बावकर | Published: June 28, 2024 3:45 PM

1 / 11
सलमान खानच्या ताफ्यात निस्सान कंपनीची एक बुलेटप्रुफ कार आहे. या कंपनीची एकमेव कार सध्या भारतीय बाजारात उपलब्ध आहे. ही कार म्हणजे निस्सान मॅग्नाईट. आमच्याकडे एएमटी (इझी शिफ्ट) ही कार रिव्हूसाठी आली होती. या कारमधील स्पेस, सस्पेंशन, पावर, मायलेज आदी गोष्टी आम्ही सुमारे १२०० किमीच्या प्रवासात अनुभवल्या. या कारच्या बुटस्पेस आणि मायलेजने आम्हाला जास्त चकीत केले.
2 / 11
खरेतर मॅग्नाईट ही कार साडे सहा लाखांपासून सुरु होते. एवढ्या कमी किंमतीत १ लीटरचे इंजिन, फोर स्टार सेफ्टी रेटिंग आणि भली मोठी बुटस्पेस केवळ याच कंपनीच्या सिस्टर कंपनीकडील कारमध्ये आहे. आम्ही मॅग्नाईट इझी शिफ्ट कार कोकणात पार अगदी पुणे ते बांद्याच्या पुढे गोव्यापर्यंत घेऊन गेलो होतो. घाटरस्ते, रात्रीचा प्रवास, उन पावसाचा लपंडाव आदीचा आस्वाद घेत या कारच्या भरवशावर मजल दरमजल करत होतो.
3 / 11
पुणे शहरातील मेट्रोची कामे, रस्त्यावरील ट्रॅफिक आणि कारमध्ये ४ जणांसाठी ८ दिवसांसाठी लागणारे साहित्य बॅगा असा लोड घेऊन आम्ही प्रवासाला निघालो. वाहतूक कोंडीत या कारने पिकअपसाठी कुठेही दमविले नाही. सायंकाळची वेळ असल्याने प्रचंड कोंडी होती, त्यातही या कारने ११-१३ चे मायलेज दाखविले. हायवेवर ७५-८० च्या स्पीडला कारने २१ किमी प्रती लीटरपर्यंत मायलेज दिले. जे खूपच आश्चर्यकारक होते. अर्थात ते चालविण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असते.
4 / 11
सिटी आणि हायवेवर गिअर शिफ्ट एकदम चांगले होत होते. आम्ही ही कार ४० किमी खोदलेल्या रस्त्यावरूनही चालविली. या दगडगोट्यांतून कारने चांगला पिकअप दिला. ४०-४५ च्या स्पीडला कारने १२.५ चे मायलेज दाखविले. तसेच सस्पेंशनही चांगले जाणवले. पुढे घाटात उतरताना मात्र इझी शिफ्टच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे मॅन्युअलवर कार चालवावी लागली.
5 / 11
उताराला असल्याने कारचे इंजिन कमी गिअरवर चालत होते. यामुळे कार खूपच स्लो होत होती, तसेच इंजिनही जास्त गुरगुरत होते. अनुस्कुरा घाटातून ये-जा केली. दरडींसाठी धोक्याचा असला तरी रस्ता एकदम तुळतुळीत आहे. यामुळे प्रवासाचा थकवा जाणवला नाही. कारचे सस्पेंशन किंमतीच्या मानाने खूपच चांगले वाटले. साऊंड सिस्टीमही ठीकठाक होती.
6 / 11
थोडा उकाडाही जाणवत होता. बहुतांश उन्हातच कार चालविली. यावेळी एसीदेखील चांगले काम करत होता. १.० लीटरचे इंजिन असले तरी एवढा लोड इंजिनवर पर्यायाने पिकअपवर पडला नाही. वळणावर देखील कार एकदम स्टेबल वाटली. कुठेही कार अनियंत्रित होतेय असे वाटले नाही.
7 / 11
इन्फोटेन्मेंट स्टिस्टिम, टच स्क्रीन आणि इन्स्ट्रूमेंट क्लस्टर किंमतीच्या मानाने खूप चांगले दिले आहेत. खड्ड्यात आदळल्यानंतर कुठेही धाड धाड, खाड खाड असे आवाज येत नव्हते एवढे चांगली प्लॅस्टिक क्वालिटी देण्यात आली आहे. आतमध्येही दणके जाणवत नव्हते.
8 / 11
चढउतारावर किंवा चालवितानाच्या गरजेप्रमाणे गिअर शिफ्ट होत होते. परंतू, गावातील रस्त्यावर जेव्हा अचानक चढ यायचा तेव्हा कुठेतरी गिअर शिफ्टमध्ये लॅग जाणवत होता. अचानक कार थांबल्यासारखी व्हायची मग जेवढी ताकद लागणार त्याचा गिअर शिफ्ट व्हायचा आणि पुढे जायची. घाटात एकदम यु टर्न जिथे असेल तिथे ही समस्या येत होती. १.० लीटर इंजिन असल्याने हे होत होते. परंतू इतर कुठेही आम्हाला पिकअपचा इश्यू जाणवला नाही. ओव्हरटेक मारताना पिकअप आणि गिअरशिफ्टमुळे थोडी सावधतेने मारावी लागत होती.
9 / 11
कारमध्ये जेवढी फिचर गरजेची आहेत ती दिलेली आहेत. ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम आहेत, परंतू ते सेंट्रल लॉकिंगसोबत नाहीत. म्हणजेच कीने कार लॉक केली तर ते फोल्ड होत नाहीत. तर आतमध्ये ड्रायव्हरच्या दरवाजावर एक बटन दिलेले आहे, ते दाबले की फोल्ड अनफोल्ड होतात. मोठी टचस्क्रीन, साऊंट सिस्टिमचा चांगला आवाज, चारही दरवाजांमध्ये पाण्याच्या बॉटल राहतील अशी सोय, सुंदर इंटेरिअर, थोडासा ड्रायव्हरकडे तिरपा केलेला डॅशबोर्ड आदी गोष्टी खूप चांगल्या आहेत. बुटस्पेसही चांगली चार-पाच जणांच्या बॅगा, साहित्य किंवा धान्याची पोती आरामात राहतील अशी आहे.
10 / 11
एक्स्टेरिअरही नजर वेधणारे आहे. कारचा लूक एकदम लक्षवेधी आहे. रिव्हर्स कॅमेरा ३६० व्ह्यू देण्यात आलेला आहे. तो चांगले काम करतो. रिअर व्ह्यू मिररची पोझिशन थोडी खाली असायला हवी होती. मागच्या काचेतून खूप कमी अंतरावरचे दिसते. यामुळे आम्हाला मागे गाड्या आहेत का हे पाहण्यासाठी सारखे साईड व्यू मिररमध्ये पहावे लागत होते.
11 / 11
या सर्व गोष्टी पाहता, एका छोट्या कुटुंबासाठी, लांबच्या प्रवासाला जाताना, बऱ्यापैकी लगेज घेऊन जाण्यासाठी ही योग्य कार वाटली. अचानक चढ आला तर पिकअपचा म्हणजेच गिअर शिफ्टचा इश्यू सोडला तर कुठेही या कारने नाऊमेद केले नाही. गरजेप्रमाणे तुम्ही मॅन्युअल गिअरशिफ्ट देखील वापरू शकता. मायलेजचे सांगायचे झाल्यास फुल टँकमध्ये कारने 580-600 किमीचे अंतर कापले. यात शहरातील ट्रॅफिक, खोदलेले रस्ते, भरपूर लगेज, घाटरस्ते, रात्रीची वेळ आदी सर्व गोष्टी होत्या. या कारने आम्हाला १५ किमी प्रती लीटरचे संमिश्र मायलेज दिले.
टॅग्स :Nissanनिस्सान