nissan magnite suv to officially launch in india on december 2 feature price details
भारतात सर्वात स्वस्त SUV असेल Nissan Magnite?, लाँचिंगची तारीख ठरली, जाणून घ्या फिचर्स व किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 2:25 PM1 / 8मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सॉनेट आणि फोर्ड इकोस्पोर्टला निसानची एसयूव्ही कार टक्कर देणार का? भारतीय बाजारपेठेत जपानची कंपनी निसान मोटर्सची नवीन कार मॅग्नाइटची (Magnite) आतुरतेने वाट पाहिली जात आहे.2 / 8निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटची लाँचिंग तारीख अंतिम केली आहे. कंपनी 2 डिसेंबर 2020 रोजी भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही निसान मॅग्नाइट लाँच करणार आहे. 3 / 8यापूर्वी 26 नोव्हेंबर रोजी लाँच होण्याची बातमी होती. इतकेच नाही तर त्याचे अनधिकृत बुकिंगही सुरू झाले आहे. काही शोरूममध्ये 25,000 रुपयांमध्ये बुकिंग होत आहे.4 / 8निसान मॅग्नाइट आपल्या सेगमेंटमध्ये एक गेम चेंजर असेल, असे निसान मोटर इंडियाचे एमडी राकेश श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे.5 / 8कंपनी ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार चार ट्रिममध्ये लाँच करु शकते. ज्यामध्ये XE, XL, XV और XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. निसान मॅग्नाइटची सुरुवातीची किंमत 5.50 लाख ते 8.15 लाख रुपयांपर्यंत असू शकते. 6 / 8निसान मॅग्नाइटमध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिले जातील. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. 7 / 8या एसयूव्हीचे नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc असेल, 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतके पीक टॉर्क जनरेट करु शकते. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आले आहे.8 / 8या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications