शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nitin Gadkari: करोडो वाचणार! आता हवेत उडणारी बस येणार; नितीन गडकरींनी लढविली आयडियाची कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 4:06 PM

1 / 8
रस्ते परिवाहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक जबरदस्त कल्पना आणली आहे. यामुळे देशाचे हजारो कोटी रुपये वाचणार आहेत. गडकरींनी नुकतीच हवेत उडणाऱ्या बसच्या संकल्पनेवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सरकार सकारात्मक असल्याची माहिती गडकरींनीच स्वत: ट्विट करून दिली आहे.
2 / 8
मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाताच नाही तर छोट्या छोट्य शहरांत आता मोठी वाहने चालविणे खूप कठीण बनत चालले आहे. मोठ्या शहरांमध्ये मेट्रो, मोनोसारखे पर्याय आहेत. परंतू छोट्या शहरांचे काय? एवढा आवाढव्य खर्च परवडणारा नाही. तसेच रस्तेही तेवढे मोठे नाहीत, की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेळेत आणि नियमित सुरु राहिल.
3 / 8
यावर गडकरींनी जबरदस्त योजना राबविण्याचे ठरविले आहे. हवेत उडणारी बस जर देशात आणली तर त्यामुळे बससाठी रस्ते करण्याचा खर्चही वाचणार आहे. शिवाय शहरांत जे बससाठी स्वतंत्र मार्गिका ठेवली जाते तिचा वापर अन्य वाहनांसाठी केल्यास कोंडीतून देखील सुटका होणार आहे.
4 / 8
ही संकल्पना आहे ‘एरियल ट्राम-वे’ (Aerial Tram-Way) ची. चला जाणून घेऊया या जगासाठी जुन्या परंतू आपल्यासाठी नव्या संकल्पनेबद्दल.
5 / 8
एरियल ट्रामवे ही अत्याधुनिक वाहतूक सुविधा आहे. रस्त्यावरील वाहतुकीचा वाढता ताण, मेट्रो किंवा मोनोरेलमधील वाढती गर्दी यामुळे आता भारतातही ही वाहतूक व्यवस्था स्वीकारण्याची चर्चा आहे. पर्वतीय भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही वाहतूक व्यवस्था वापरली जाते. लोक रोपवे म्हणतात. परंतू रोपवे हा छोटेखानी प्रकार असतो. ही एका छोट्या मिनीडोर सारखी असणार आहे.
6 / 8
एरियल ट्राम-वे मध्ये एका मार्गावर फक्त दोन केबिन असतात. लोखंडी दोरीवर बांधलेल्या या केबिन हालचालींसाठी एकमेकांना पूरक आहेत. एक केबिन वर आली की दुसरी केबिन खाली जाते. यामध्ये केबिन गोलाकार हालचाल करत नाही तर फक्त पुढे आणि मागे सरकते.
7 / 8
डोंगराळ किंवा दुर्गम भागात जिथे रस्ते बांधणे कठीण किंवा खूप महाग आहे, हवाई ट्रामवे फायद्याची ठरू शकते. एकावेळी 25 ते 230 प्रवासी प्रवास करू शकतात. त्यांचा वेग ताशी 45 किमी पर्यंत देखील असू शकतो. यामुळे मेट्रो, मोनोसारख्या महागड्या पर्यायांऐवजी ट्राम-वे मोठ्या शहरांमध्ये स्वस्तातील पर्याय ठरतील. जागाही कमी लागते.
8 / 8
अशाप्रकारच्या एरियल ट्राम-वे या भारतात पर्यटन असलेल्या ठिकाणी सर्वाधिक पहायला मिळतात. युरोपीय देश आणि अमेरिकेतील अनेक भागात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीTrafficवाहतूक कोंडी