No test required for driving license You will get the license only after completing the training
Driving Licence: ड्रायविंग लायसन्ससाठी टेस्ट नाही; ट्रेनिंग पूर्ण केल्यावरच मिळणार लायसन्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:04 PM1 / 10ड्रायव्हिंग लायसन्स बनण्याची इच्छा असलेल्या तरूणांची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची अट आता संपण्याची चिन्ह आहेत. 2 / 10याव्यतिरिक्त लायसन्ससाठी लागणारा महिन्यांचा कालावधीही कमी होण्याच्या मार्गावर आहे. रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयानं ड्रायविंग ट्रेनिंग सेंटर्सबाबत एक ड्राफ्ट तयार केला आहे. 3 / 10सरकारच्या या ड्राफ्टचं नियमामध्ये रूपांतर झाल्यानंतर कोणत्याही त्रासाशिवाय लोकांना लायसन्स तयार करता येणार आहे. 4 / 10रस्ते वाहतूनक आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देण्यासंदर्भात एक अधिसूचनेचा मसुदा तयार केला आहे. 5 / 10सरकार या माध्यमातून नागरिकांना चांगलं ड्रायविंग ट्रेनिंग देऊ इच्छित आहे. 6 / 10कोणताही व्यक्ती या केंद्रांवर यशस्वीरित्या आपली टेस्ट पूर्ण करेल तर त्याला ड्रायविंग लायसन्ससाठी अर्ज करताना द्यावी लागणारी टेस्ट द्यावी लागणार नसल्याची तरतूद यात करण्यात आली आहे. 7 / 10या निर्णयामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रालाही मदत मिळणार आहे. कारण त्यांना विशेष रूपानं प्रशिक्षित ड्रायव्हर मिळणार आहेत. 8 / 10तसंच चांगल्या ड्रायव्हर्समुळे रस्ते अपघाताचं प्रमाणही कमी होईल. सध्या हा मसुदा मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला असून त्यासंदर्भात सूचना मागवण्यात आल्या आहेत.9 / 10सध्या ड्रायविंग लायसन्स तयार करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. याअंतर्गत अर्ज करणाऱ्यांना टेस्टसाठी ऑनलाईन अप्लाय करावं लागतं. 10 / 10काही महिन्यांच्या नंतर त्यांना टेस्टसाठी बोलावलं जातं. यानंतर लायसन्स मिळण्यातही मोठा कालावधी जातो. अशातच हा प्रस्ताव लागू झाल्यानंतर ड्रायविंग टेस्टची समस्या संपणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications