शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Go Toll Free: टोलनाक्यावर जाताना पिवळ्या लाईनकडे लक्ष ठेवा;...तर टोल द्यावा लागणार नाही; जाणून घ्या नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 6:38 PM

1 / 10
वाढच्या पेट्रोल, डिझेलच्या दरांनी लोकांना हैरान केले आहे. मात्र, केंद्र सरकारने वाहन चालकांना एक दिलासा दिला आहे. हा दिलासा टोल नाक्यावरील (Toll Plaza) रांगांवर आहे. ( new guidelines will also ensure seamless flow of traffic at the toll plazas by not allowing vehicles to queue up more than 100 metres)
2 / 10
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या नवीन गाईडलाईननुसार टोल नाक्यावर जर तुमची गाडी मोठ्या वेटिंगमध्ये रांगेत असेल तर एका ठराविक अंतराच्या आतील गाड्यांना फुकट सोडले जाणार आहे.
3 / 10
NHAI च्या या नव्या गाईडलाईननुसार जर तुम्ही टोल प्लाझावर रांगेत असाल आणि जर ती रांग टोल बुथपासून 100 मीटरच्या पलिकडे गेली तर त्या अंतरातील सर्व गाड्यांना कोणताही टोल न आकारला सोडले जाणार आहे.
4 / 10
म्हणजेच जर तुमची गाडी त्या 100 मीटरच्या आत असेल आणि तुमची रांग जर 100 मीटरपेक्षा जास्त मोठी झाली तर तुम्हाला फुकट सो़डले जाणार आहे.
5 / 10
याचाच अर्थ जर तुम्ही १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर म्हणजेच पलिकडे असाल तर तुमच्या पुढे टोल बुथपासून 100 मीटर अंतरातील गाड्यांना मोफत सोडले जाणार आहे. पुढील गाड्या सोडण्यात आल्याने तुमचा नंबर लवकर लागणार असून तुम्हाला मात्र टोल द्यावा लागणार आहे.
6 / 10
टोलनाक्यावरील रांगा आणि त्यामुळे होणारा विलंब कमी करण्यासाठी एनएचएआयने हा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर 100 मीटरवर एक पिवळी लाईन आखली जाणार आहे. (Meaning of Yellow line on Toll Plaza.)
7 / 10
जर वाहनांची रांग या वेटिंग लाईनच्या पलिकडे गेली तर आतील गाड्यांना टोल नाक्यावरून मोफत सोडले जाणार आहे. वाहनांची रांग या लाईनच्या आत ठेवण्यासाठी टोल नाक्यांनादेखील आता प्रयत्न करावे लागणार आहेत.
8 / 10
फेब्रुवारीपासून देशभरात फास्टॅग लागू करण्यात आला आहे. मात्र, तरी देखील टोलनाक्यांवर मोठमोठ्या रांगा लागत होत्या. यामुळे Fastag चा मुळ उद्देशच दूर राहिला होता. आता Fastag असला तरीदेखील जर रांग 100 मीटरच्या पलिकडे गेली तर टोल न घेताच सोडावे लागणार आहे.
9 / 10
100 मीटरच्या आतील वाहनांना जेव्हा या अटीनुसार सोडले जाईल तेव्हा त्यांच्या फास्टॅगमधून रक्कम कापली जाणार नाही. याचबरोबर NHAI ने एका कारला टोल बूथ क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागायला हवा हे देखील ठरवून दिले आहे.
10 / 10
टोल नाक्यावरून एका कारला 10 सेकंदांत पास करावे लागणार आहे. फास्टॅग असूनही टोल नाक्यांवर काही मिनिटे स्कॅन होण्यासाठी लागत आहेत. यामुळे मागे रांगा वाढत जातात. या नियमामुळे वेळेसोबत इंधनाचीही बचत होणार आहे. (National Highways Authority of India (NHAI) has issued guidelines to ensure service time of not more than 10 seconds per vehicle even during peak hours at the toll plazas on the National Highways.)
टॅग्स :tollplazaटोलनाकाFastagफास्टॅगAutomobileवाहन