शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शाईन, पल्सर, ज्युपिटर, प्लॅटिना नाही, तर या बाईकची होतेय तुफान खरेदी; स्कुटरमध्ये या मॉडेलचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 4:21 PM

1 / 9
जर तुम्ही स्वतःसाठी नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सची संपूर्ण यादी सांगत आहोत. गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये हिरो स्प्लेंडर आणि स्कूटरमध्ये Honda Activa यांची सर्वाधिक विक्री झाली होती.
2 / 9
ही दोन मॉडेल्स यादीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून स्प्लेंडर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दुचाकींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे अक्विटा नंबर-2 वर आहे.
3 / 9
त्यांच्या मागणीसमोर इतर सर्व मॉडेल्स खूप मागे आहेत. Honda CB Shine, Bajaj Pulsar आणि TVS Jupiter यांनाही टॉप-5 यादीत स्थान मिळाले आहे. प्रथम आपण यातील टॉप 10 मॉडेल्सची यादी पाहू.
4 / 9
या दहा मॉडेल्समध्ये पहिल्या क्रमांकाव हीरो स्प्लेंडर आहे. त्यानंतर या यादीत हाँडा ॲक्टिव्हाचा नंबर येतो. याशिवाय यात होंडा सिबी शाईन, बजाज पल्सर, टीवीएस ज्युपिटर, एचएफ डिलक्स, सुझुकी ॲक्सेस, बजाज प्लॅटिनास टिवीएस एक्सएल 100 आणि टिवीएस आपाचे टोटल यांचा समावेश आहे.
5 / 9
हीरो स्प्लेंडर प्लस बाईकमध्ये 97.2 cc एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.02 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर तिचे मायलेज जबरदस्त आहे. ही बाईक 80.6 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
6 / 9
बाइकमध्ये कंपनी DRL, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल ट्रिप मीटर, फ्युएल गेज, डिजिटल ओडोमीटर, TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, यूएसबी चार्जिंग पोर्ट, कॉल एसएमएस अलर्ट, बॅक अँगल सेन्सर, इंजिन कट ऑफ ऑटोमॅटिक फॉल, साइड स्टँड इंजिन कट ऑफ, हाय बीम इंडिकेटर सारखे फीचर्स देत आहे.
7 / 9
तर दुसरीकडे होंडाने नुकतीच Activa H-Smart लाँच केली आहे. यात BS6 109.51cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. त्याचे मायलेज सुमारे 50Km/l आहे.
8 / 9
न्यू जनरेशन Activa H-Smart सोबत कंपनी स्मार्ट-की ऑफर करत आहे. स्कूटरपासून 2 मीटर दूर गेल्यावर ती आपोआप लॉक होईल. तुम्ही त्याच्या जवळ येताच ते अनलॉक होईल. पेट्रोलसाठी तुम्हाला त्याचे इंधन झाकण उघडण्यासाठी की वापरण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, तुम्ही फक्त स्मार्ट-कीच्या मदतीने ते उघडू शकता.
9 / 9
या न्यू जनरेशन स्कूटरमध्ये स्टँडर्ड व्हेरियंटप्रमाणेच सायलेंट स्टार्ट सिस्टीम आणि कंबाईंड ब्रेकिंग सिस्टीम दिसेल. यामध्ये अलॉय व्हील्स नवीन डिझाइनसह आणण्यात आले आहेत. स्कूटरला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, सिंगल-रीअर स्प्रिंग आणि दोन्ही व्हिल्सवर ड्रम ब्रेक्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र, डिझाइनच्या बाबतीत फारसा बदल दिसत नाही.
टॅग्स :Hondaहोंडाbikeबाईक