शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता घरा-घरात 'थार'! मोठ्या बदलांसह येतेय स्वस्तातली Mahindra Thar, किंमत असेल फक्त एवढी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 2:04 PM

1 / 9
महिंद्रा थारचे नाव घेताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एका दमदार ऑफरोडरचे चित्र उभे राहते. पॉवरफुल इंजिन, जबरदस्त स्टांस आणि खास स्टाइलमुळे ही एसयूव्ही तरुणांमध्ये जबरदस्त लोकप्रीय आहे. अनेक फीचर्स आणि वैशिष्ये असतानाही ही एसयूव्ही आपली मोठी किंमत आणि कमी सीटिंग कॅपिसिटीमुळे, अनेक ग्राहकांच्या बकेट लिस्टमधून अजूनही दूर आहे.
2 / 9
मात्र, लवकरच महिंद्रा थारचे एक स्वस्त व्हर्जनही बाजारात येणे अपेक्षित आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, महिंद्रा लवकरच एक स्वस्तातली Mahindra Thar लॉन्च करणार आहे आणि हे नवे व्हर्जन एका मोठ्या बदलासह सादर केले जाईल.
3 / 9
माध्यमांतील वृत्तांनुसार, महिंद्रा थार लवकरच एका नव्या पॉवरट्रेनच्या स्वरुपात सादर केली जाणर आहे. आता कंपनी ही एसयूव्ही नव्या 1.5 लिटर डिझेल इंजिनसह लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. जी सध्याच्या 2.2 लिटर डिझेल आणि 2.0 लिटर पेट्रोल) सोबतच विकले जाईल.
4 / 9
हे नवे इंजिन दिल्यानंतर, ही SUV नव्या टॅक्स ब्रॅकेटमध्येही सह फीट होईल. कारण ही आधीपासूनच अंडर फोर मीटर सेग्मेंटमध्ये येते. या एसयूव्हीची लांबी केवळ 3,985 mm एवढी आहे.
5 / 9
कसे असेल Mahindra Thar चे नवे स्वस्त व्हेरिअँट - वर सांगितल्याप्रमाणे, एन्ट्री लेव्हल व्हेरिअंटमध्ये कंपनी 1.5 लिटर डिझेल इंजिनचा वापरू शकते. जे 117hp पॉवर जेनरेट करते. कंपनीने याच इंजिनचा वापर Marazzo मध्येही केला होता. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, यात यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही देण्यात येण्याची शक्यता आहे. जे या व्हेरिअंटी किंमत कमीत कमी ठेवण्यास मदत करेल.
6 / 9
महिंद्राच्या या स्वस्त व्हेरिअंटमध्ये आणखी एक मोठा बदल त्याच्या ड्रायव्हिंग सिस्टीमसंदर्भातही बघायला मिळू शकतो. ही एसयुव्ही टू-व्हील ड्राइव्ह (2WD) सिस्टिममध्ये येऊ शकते असेही बोलले जात आहे. सध्याचे डिझेल मॉडेल हे फोर व्हील ड्राइव्ह (4WD) सिस्टिमसह येते. यामुळे या एसयूव्हीची किंमत कमी होण्याची दाट शक्यता आहे. इंटरनेटवर या एन्ट्री लेव्हल महिंद्रा थारचे इंटीरिअर फोटोही लिक झाले आहेत.
7 / 9
डिझेल इंजिन शिवाय कंपनी सध्याचे 2.0 लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिअंट देखील टू-व्हील ड्राइव्ह (2WD) सिस्टिमसह सादर करेल. यातही 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात येईल.
8 / 9
किती असू शकते किंमत आणि केव्हा होणार लॉन्च? - माध्यमांतील वृत्तांनुसार कंपनी नवी आणि खिशाला परवडणारी महिंद्रा थार पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सादर करू शकते. मात्र, लॉन्चपूर्वीच हिच्या किंमतीसंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य करणे अवघड आहे. मात्र काही जानकारांचे मते, नव्या थारची किंमत सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत बरीच कमी असेल.
9 / 9
सध्या बाजारात असलेल्या मॉडेलची किंमत 13.59 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. टू-व्हील ड्राइव्ह आणि छोट्या इंजिनच्या वापरामुळे कंपनीला एक्साईजचाही फायदा होईल आणि कदाचित ही 10 लाख रुपयांमध्येही लॉन्च केली जाऊ शखते.
टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारAutomobileवाहन