शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Okinawa Okhi 90: पेट्रोलला गुडबाय बोला! 20 पैशांत 1 किमी, एका चार्जमध्ये 200 ची रेंज; ओकिनावाची स्कूटर आली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 8:31 AM

1 / 10
भारतात लोकप्रिय झालेली आणि अस्सल भारतीय कंपनी ओकिनावाने पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींच्या काळात एक जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटरसारखी असली तरी मोटरसायकला फिल देणारी आहे. Okinawa Okhi 90 (ओकिनावा ओखी-90) लाँच करण्यात आली आहे.
2 / 10
महत्वाची बाब म्हणजे या स्कूटरची सीट मोठी आहे. अन्य ईव्ही स्कूटरसारखी एकदम छोटी नाही. तसेच ० ते ८० टक्के बॅटरी ही केवळ एका तासात चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे. चला जाणून घेऊयात याचे फिचर्स
3 / 10
16 इंचाचे स्टायलिश अॅल्युमिनिअम अलॉय व्हील देण्यात आले आहेत. खरे पाहता ही एक प्रॅक्टिकल स्कूटर आहे. म्हणजे चाळीस लीटरचा बुटस्पेस, पायात पिशव्या ठेवण्यासाठी दोन-दोन नॉब देण्यात आले आहेत. तसेच पाठीमागे साहित्या बांधण्यासाठी देखील कॅरिअर देण्यात आली आहे.
4 / 10
Okinawa Okhi-90 ही भारतीय रस्त्यांवरील उच्च-कार्यक्षमता इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात 3800 वॅटची मोटर आहे. यात काढता येण्याजोगा 72V 50 Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. स्कूटरची बॅटरी एका तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते. तर बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.
5 / 10
ही स्कूटर केवळ 10 सेकंदात 0 ते 90 किमी प्रतितास वेग घेते. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही इको मोडमध्ये 55 ते 60 किमी प्रतितास आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 85 ते 90 किमी प्रतितास वेगाने चालवू शकता.
6 / 10
जलद चार्जिंगसह सुसज्ज, Ockhi-90 एका पूर्ण चार्जवर 160 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. कंपनीचे एमडी जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरच्या स्पोर्ट्स मोडवर 160 किमीची रेंज उपलब्ध असेल. त्याच वेळी, ही स्कूटर इको मोडवर 200 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.
7 / 10
Okinawa Okhi 90 इलेक्ट्रिक स्कूटरला पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक मिळतात. यासोबत ते CBS (कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीम) सह येतात. सस्पेंशनसाठी, यात पुढच्या बाजूला हायड्रॉलिक टेलिस्कोपिक सस्पेंशन आहे. तर मागील बाजूस ड्युअल ट्यूब तंत्रज्ञानासह दुहेरी शॉकर्स मिळतात.
8 / 10
इन-बिल्ट नेव्हिगेशन, डिजिटली माहितीपर स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाईल चार्जिंग यूएसबी-पोर्ट, 40 लीटरची बूट स्पेस, लगेज बॉक्स लाइट, जिओ-फेन्सिंग, सुरक्षित पार्किंग यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला बॅटरी चार्जिंगची माहिती, स्पीड अलर्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट, म्युझिक प्ले कंट्रोल्स तसेच इन्शुरन्स मेन्टेनन्ससाठी अलर्ट देते.
9 / 10
Okinawa Autotech ने Okinawa-90 ला आकर्षक लुक देण्यासाठी 4 रंग पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. यामध्ये ग्लॉसी वाईन रेड, ग्लॉसी पर्ल व्हाइट, ग्लॉसी अॅश ग्रे आणि ग्लॉसी ज्वेलरी ब्लू यांचा समावेश आहे.
10 / 10
Okinawa Ockhi 90 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देशभरात एक्स-शोरूम 1.21 लाख रुपयांपासून सुरू होते. भारतीय बाजारपेठेत ते ओला एस१, सिंपल वन, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब, एथर ४५०एक्स यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. महाराष्ट्रात या स्कूटरची किंमत १.०३ लाख आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर