शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OLA S1 Air Launch: Ola ची नवी इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च, स्वस्त आणि मस्त; २५ पैशात चालणार १ किमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 5:09 PM

1 / 9
दिवाळीचं औचित्य साधून ओला कंपनीनं आपली नवी इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च केली आहे. Ola S1 Air नावानं नवी इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. कंपनीचे प्रमुख भावेश अग्रवाल यांनी या नव्या स्कूटरची संपूर्ण माहिती आज सांगितली. अवघ्या २५ पैशात प्रति किलोमीटर खर्चात ही स्कूटर चालणार आहे.
2 / 9
Ola S1 Air स्कूटरला कंपनीनं फ्लॅगशिप प्रोडक्ट Ola S1 च्याच धर्तीवर अपग्रेड केलं आहे. पण नव्या स्कूटरची किंमत आधीच्या स्कूटरपेक्षा खूप कमी आहे. कंपनीनं आज Ola S1 Air स्कूटर अवघ्या ८४,९९९ रुपयांत लॉन्च केली आहे.
3 / 9
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबरपर्यंत कंपनीनं या स्कूटरवर छान ऑफर सुद्धा दिली आहे. सध्यासाठी तुम्हाला या स्कूटरसाठी ७९,९९९ रुपये द्यावे लागतील. तसंच ही स्कूटर ९९९ रुपयांत बूक करता येणार आहे.
4 / 9
कंपनीच्या दाव्यानुसार Ola S1 Air सिंगल चार्जच्या इको मोडमध्ये १०१ किमीहून अधिकची रेंज देईल. तर या स्कूटरची टॉप स्पीड ९० किमी प्रति तास इतकी आहे. ही स्कूटर ०-४० किमी प्रति तास इतका स्पीड अवघ्या ४.३ सेकंदात गाठते.
5 / 9
स्कूटरचं वजन अवघ ९९ किलोग्रॅम इतकं आहे. कंपनीनं यात 4.5kW की इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. तसंच यात 2.4kWh चा बॅटरी पॅक ऑफर केला गेला आहे. स्कूटरमध्ये तीन राइड मोड देण्यात आले आहेत.
6 / 9
Ola S1 Air स्कूटर पूर्ण चार्ज करण्यासाठी साडेचार तासांचा कालावधी लागतो. या स्कूटरमध्ये तीन राइड मोड देण्यात आले आहे. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड यांचा समावेश आहे. कंपनीनं ही स्कूटर एकूण ५ रंगात लॉन्च केली आहे. यात नियो मिंट, जेट ब्लॅक, कोरल ग्लॅम, पोर्सीलेन व्हाइट आणि लिक्विड सिल्वर या रंगांचा समावेश आहे.
7 / 9
Ola S1 Air ची Purchase Window फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. तर एप्रिल २०२३ मध्ये या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार आहे.
8 / 9
Ola S1 Air ची Purchase Window फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. तर एप्रिल २०२३ मध्ये या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार आहे.
9 / 9
Ola S1 Air ची Purchase Window फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. तर एप्रिल २०२३ मध्ये या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार आहे.
टॅग्स :Olaओला