Ola Electric scooter booked? Check 5 alternatives with up to 240 km range, 70 minutes charging time
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 6:31 PM1 / 9ओलाने टॅक्सी सेवेच्या माध्यमातून चांगलेच नाव कमावले आहे. यामुळे त्यांची ईलेक्ट्रीक स्कूटर (Ola Electric Scooter) आली नाही तोवर लाखोंच्या उड्या पडल्या आहेत. यामुळे बजाज, हिरो, एथर, टीव्हीएस सारख्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. (5 alternative to Ola Electric Scooter; see list)2 / 9होंडा, सुझुकीसारख्या कंपन्या तर अद्याप स्पर्धेतही नाहीत. परंतू, असे असले तरीदेखील ओलाच्या स्कूटरला या पाच कंपन्यांच्या स्कूटर कडवी टक्कर देणार आहेत. 3 / 9बंगळुरुची स्टार्टअप कंपनी सिंपल एनर्जी (Simple Energy) ओलाच्या या स्कूटरला टक्कर देण्याची ताकद ठेवते. सिंपल वन ही स्कूटर ऑगस्टमध्ये लाँच करणार आहे. 4 / 9कंपनीने ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये 240 किमीची रेंज देत असल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर 70 मिनिटांत फुल चार्ज होते. या स्कूटरची किंमत 1.20 लाख असण्याची शक्यता आहे. 5 / 9इलेक्ट्रीक स्कूटरच्या बाजारात काही वर्षांपासून एथर एनर्जी कंपनीने नाव कमावले आहे. Ather Energy ने गेल्या वर्षी Ather 450X ही स्कूटर लाँच केली आहे. 6 / 9ही स्कूटर भारतीय बाजारातील सध्याच्या घडीला सर्वाधिक खपाची ई स्कूटर आहे. या स्कूटरची दिल्लीतील किंमत 1,32,426 लाख आहे. ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये 116 किमीची रेंज देते. तर 80 टक्के चार्ज होण्यासाठी 3 तास 35 मिनिटे लागतात. 7 / 9टीव्हीएस ही भारतीय बाजारातील प्रमुख कंपनी आहे. ज्युपिटर, स्कूटी पेप ही तिची लोकप्रिय उत्पादने. टीव्हीएसने ईलेक्ट्रीक स्कुटरही लाँच केली आहे. TVS iQube ही स्कूटर 4.2 सेकंदांत 40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. फुल चार्जमध्ये स्कूटर 75 किमी जाते. 8 / 9यामहा लवकरच भारतीय बाजारात इलेक्ट्रीक स्कुटर लाँच करणार आहे. कंपनीने भारतीय पॉलिसीचा अभ्यास करत असल्याचे म्हटले आहे. यानंतरच त्यानुसार स्कूटर उतरवली जाणार आहे. ओलाची स्कूटर घेताना हा पर्यायही मिळण्याची शक्यता आहे. 9 / 9सुझुकीने देखील त्यांची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. सुझुकी बर्गमन ही स्कूटर ईलेक्ट्रीक रुपात लाँच केली जाणार आहे. कंपनीने अद्याप याची तारीख सांगितलेली नाही. हा देखील एक पर्याय ठरणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications