शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ola Electric Scooter Fresh Problems: ओला इलेक्ट्रीक स्कूटरचे ग्राहक वैतागले; पहिल्याच आठवड्यात संकटांवर संकटे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 1:48 PM

1 / 12
ओलाने उशिराने का होईना पहिल्या 100 ग्राहकांना मोठ्या कार्यक्रमात ओला इलेक्ट्रीक स्कूटर सोपविल्या. परंतू पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भ्रमनिरास झाला होता. काही फिचर्स या स्कूटरमधून गायब होती. यावर ओलाने पुढील सॉफ्टवेअर अपडेटमध्ये मिळतील असे सांगत वेळ मारून नेली होती. परंतू आता दहा दिवस उलटून गेले आहे. आता ओलाच्या स्कूटरची आणि त्यांच्या मोठमोठ्या दाव्यांची पोलखोल होऊ लागली आहे.
2 / 12
स्कूटरची दाव्यातील रेंज आणि ग्राहकांना मिळत असलेली खरी रेंज यामध्ये मोठा फरक पडू लागला आहे. तसेच स्कूटरच्या क्वालिटीवरून देखील ग्राहकांना मनात शंका येऊ लागल्या आहेत. याचबरोबर होम डिलिव्हरी करताना स्कूटर आपटून धोपटून मिळत आहेत.
3 / 12
ओलाने 2019 मध्ये मोठी घोषणा केली होती. सुरुवातीला भारतीय शहरांमध्ये कॅब प्रवासी सेवेच्या धंद्यात उतरून नाव कमविणाऱ्या ओलाने इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली होती. 2020 च्या सुरुवातीला कंपनीने हळूहळू स्कूटरची फिचर सांगायला सुरुवात केली. 250 किमीची रेंज आदी. परंतू लाँच करताना 121 आणि 181 किमीची रेंज असल्याचे कंपनीने सांगितले.
4 / 12
असे असले तरी काही दिवसांपूर्वी कंपनीने ओलाच्या एस१ प्रोची खरीखुरी रेंज 181 ऐवजी 135 किमी असल्याचे जाहीर केले. आता ओलाची स्कूटर ज्या ग्राहकांना मिळालीय त्यांना ही देखील रेंज मिळत नाहीए. टेस्ट ड्राईव्हवेळी स्कूटर वेगळी रेंज दाखवत होती आणि विकत घेतल्यावर त्यापेक्षाही कमी रेंज मिळत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
5 / 12
कार्तिक वर्मा नावाच्या ग्राहकाने मनीकंट्रोलला माहिती दिली आहे. तसेच ट्विटही केले आहे. त्याला जी स्कूटर होम डिलिव्हर करण्यात आली तिला अनेकठिकाणी आपटलेले आहे. तसेच काही पार्टना क्रॅक गेलेले आहेत. बॉडीला डेंट आलेले आहेत. त्याने ही स्कूटर नको, दुसरी द्या असे कंपनीला सांगितले आहे, यावर कंपनीने तुम्हाला खराब झालेले पार्ट दुरुस्त म्हणजेच बदलून दिले जातील असे सांगत नकार दिला आहे.
6 / 12
वर्मा म्हणतात, मी नवीन वस्तू विकत घेतलीय, त्यासाठी पैसे दिलेत. दुरुस्त केलेल्या किंवा रिफर्बिश केलेल्या वस्तूसाठी नाही. एलसीडी पॅनेलमध्ये मोठी गॅप आहे. त्यात पाणी गेले की एलसीडी खराब होणार, मग हे त्याच्यासाठी पैसे उकळणार, असा आरोप त्याने केला आहे.
7 / 12
ओला इलेक्ट्रीक सुरुवातीपासूनच ग्राहकांना उत्तर देण्यास कुचराई करते. याचा अनुभव स्कूटर बुकिंग करताना अनेकांना आला आहे. दुसरा मुद्दा इन्शुरन्सचा एका ग्राहकाने उचलला आहे.
8 / 12
ओलाने स्कूटर बुक करताना इन्शुरन्ससाठी पैसे घेतले आहेत. परंतू पॉलिसीवरील रक्कम आणि त्यांनी घेतलेले पैसे यामध्ये 600-700 रुपयांचा फरक आहे. राहुल प्रसाद यांनी हे ट्विट केले आहे. इन्शुरन्ससाठी ओलाने 7471 रुपये घेतले आणि 6695 रुपये इन्शरन्स पॉलिसीवर दिसत आहेत. हा काय गोंधळ आहे, असा सवाल त्याने केला आहे.
9 / 12
रेंजमध्येही फसवले? ओलाने आधी 181 किमीची रेंज सांगितली होती. टेस्ट ड्राईव्हवेळी त्या स्कूटर 150-152 किमीची रेंज दाखवत होत्या. डिलिव्हरी झाली तेव्हा स्कूटर 135 किमी रेंज दाखवत होत्या. परंतू ग्राहक जेव्हा चालवू लागले तेव्हा या स्कूटर 98 ते 100 किमीच गाड्या नेऊ शकले आहेत. अनेकांना हाच प्रॉब्लेम आला आहे.
10 / 12
ग्राहकांनी ओलाच्या अॅपवर होम चार्जर खरेदी केला आहे. परंतू त्याचे इन्स्टॉलेशन कंपनी करू शकली नाहीय. या ग्राहकांना त्यांच्या स्कूटर अन्य ठिकाणी जाऊन चार्ज कराव्या लागत आहेत. कंपनीने होम चार्जरसाठी 2,359 रुपये घेतले आहेत.
11 / 12
काही ग्राहकांना कंपनीने डिलिव्हरी इव्हेंटला गर्दी जमविण्यासाठी बोलविले होते. 15 डिसेंबरला त्यांना तुम्हाला थोड्याच दिवसाच स्कूटर डिलिव्हर केली जाईल असे सांगितले सुद्धा. परंतू आजवर त्यांना स्कूटर डिलिव्हर केलेली नाही.
12 / 12
टोडी नावाच्या ग्राहकाने तर ओला स्कूटरची पोलखोल केली आहे. आदल्या दिवशी त्याला स्कूटरची डिलिव्हरी मिळाली, दुसऱ्या दिवशी सहा किमी नाही चालविली तेवढ्यात त्या स्कूटरमधून विचित्र आवाज येऊ लागले. हेडलाईटमध्ये देखील समस्या होती. ही स्कूटर अखेर टो करून न्यावी लागली. काही तासांत देतो असे सांगतिले परंतू दिवस संपला तरी त्याला काही कळविण्यात आले नाही.
टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन