ola electric scooter next sale open november 1st price features details
एक महिना प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा OLA इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 9:54 PM1 / 8जर तुम्हीही ओला इलेक्ट्रिक स्कूटर (OLA Electric scooter) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता एक महिना वाट पाहावी लागेल. या स्कूटरची पुढील विक्री 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. यापूर्वी, कंपनीने 15 सप्टेंबरपासून स्कूटरची अधिकृत बुकिंग सुरू केली होती, जी 16 सप्टेंबरपर्यंत चालली.2 / 8दरम्यान, ओला इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल प्रचंड क्रेझ दिसून आहे. खरंतर, 15 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ओला स्कूटरच्या विक्रीमध्ये कंपनीने पहिल्या दिवशी 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्कूटरची विक्री केली. दुसऱ्या दिवशीही ग्राहकांनी 500 कोटी रुपयांच्या या स्कूटर खरेदी केल्या.3 / 8ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे सांगितले होते की, विक्रीचा दुसरा दिवस पहिल्या दिवसापेक्षाही चांगला होता. 2 दिवसात 1100 कोटींची विक्री पार झाली. भाविश अग्रवाल यांच्या मते, कंपनीने प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर विकल्या आहेत.4 / 8कंपनीने ओला स्कूटरचे 2 मॉडेल लॉन्च केले आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने नुकतेच S1 आणि S1 Pro हे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. 5 / 8यामध्ये ओला S1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आणि ओला S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये आहे. केंद्राने सुरू केलेली फेम 2 सबसिडी आणि राज्य सरकारांनी दिलेल्या सबसिडीचा ग्राहक लाभ घेऊ शकतात. 6 / 8दरम्यान, ओला स्कूटरची बुकिंग सुरू झाली, तेव्हाही कंपनीने एक विक्रम केला होता. त्यानंतर कंपनीला एका दिवसात 1 लाखाहून अधिक ओला स्कूटरची बुकिंग मिळाली. कंपनीने फक्त 499 रुपयांमध्ये ओला स्कूटरची बुकिंग सुरू केली. आता कंपनीने ओला स्कूटर फक्त त्या लोकांसाठी खरेदी करण्याची खिडकी उघडली आहे, ज्यांनी आधीच बुक केले आहे.7 / 8ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.9 kwh च्या क्षमतेची बॅटरी पॅक देण्यात आले आहे आणि याची इलेक्ट्रिक मोटर 8.5 kW पीक पॉवर जनरेट करते. कंपनीने दावा केला आहे की, याची बॅटरी 750W क्षमतेच्या पोर्टेबल चार्जरसह सुमारे 6 तासात पूर्णपणे चार्ज होईल. 8 / 8याशिवाय, कंपनीचा सुपरचार्जर फक्त 18 मिनिटांत 50% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकतो. ओलाचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 180 ते 190 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. आणखी वाचा Subscribe to Notifications