ola electric scooter sale starts today step by step guide finance emi and delivery details
केवळ 'अशा' पद्धतीनं खरेदी करू शकता Ola Electric Scooter; पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 9:24 PM1 / 15देशातील प्रमुख कॅब सेवा पुरवणारी कंपनी OLA नं काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रीक मोबिलिटीच्या दिशेनं पाऊल टाकत Ola S1 स्कूटर लाँच केली होती. याची आता अधिकृतरित्या विक्रीही सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना केवळ 499 रूपये देऊन ही स्कूटर बुक करता येणार आहे. 2 / 15जर तुम्ही विचार करत असाल की आपण बाहेर जाऊन ओलाच्या डीलरशीपमधून ही स्कूटर बुक करून तर तसं तुम्हाला बिलकुल करता येणार नाही. सध्या ही स्कूटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ऑनलाइन बुकींग हा एकमेव पर्याय आहे.3 / 15कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्हाला ओलाची इलेक्ट्रीक स्कूटर बुक करता येणार आहे. तसंच याच ठिकाणाहून ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. अनेक दिवसांपासून बरेच जण या इलेक्ट्रीक स्कूटरच्या प्रतीक्षेत होतं. कंपनीनं ही स्कूटर दोन व्हेरिअंट S1 आणि S1 Pro मध्ये लाँच केली आहे.4 / 15भारतीय बाजारपेठेत Ola S1 ची किंमत 85,099 रूपये, तर Ola S1 Pro ची किंमत 1.10 लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत दिल्लीनुसार देण्यात आली आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून देण्यात आलेल्या दोन्ही किंमतींचा समावेश करण्यात आला आहे.5 / 15या इलेक्ट्रीक स्कूटरची सर्वात कमी किंमत ही गुजरात मध्ये आहे. या ठिकाणी Ola S1 या मॉडेलची किंमत 79,999 रूपये इतकी आहे. तर Ola S1 Pro या मॉडेलची किंमत 109999 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात या स्कूटरच्या Ola S1 या व्हेरिअंटची किंमत 94,999 रूपये आणि Ola S1 Pro या व्हेरिअंटची किंमत 1,24,999 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.6 / 15दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान व्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये Ola S1 व्हेरिअंटची किंमत 99,999 रूपये आणि Ola S1 Pro या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रूपये इतकी निश्चित करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. ओलानं आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये जबरदस्त फीचर्स सामिल केले आहे. तसंत हे फीचर्स सध्या देशात उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्कूटरमध्ये पाहायला मिळत नाही.7 / 15तुम्ही ही स्कूटर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे फक्त 499 रुपयांमध्ये बुक करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवरील रिझर्व्ह टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपण दोन व्हेरिअंटपैकी कोणताही एक निवडू शकता तसेच रंग निवडू शकता.8 / 15कंपनीनं या स्कूटरमध्ये आर्टिफिशिअल साऊंड सिस्टम दिला आहे. तुम्ही आपल्या मर्जीनुसार स्कूटरचा साऊंड बदलू शकता. तसंच कंपनीनं यामध्ये 4G कनेक्टिव्हीटीही दिली आहे. याच्या मदतीनं तुम्ही सतत इंटरनेटशी कनेक्ट राहू शकता. तुम्ही आपल्या स्मार्टफोनच्या मदतीनं या स्कूटरचे अनेक फीचर्स ऑपरेट करू शकता. यामध्ये स्कूटर लॉक आणि अनलॉक करण्याच्या फीचरचाही समावेश करण्यात आला आहे.9 / 15व्हेरिएंट आणि रंग निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एन्टर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जाईल जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवेवर घेऊन जाईल, जिथे तुम्ही यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे भरून तुमची स्कूटर बुक करू शकता.10 / 15स्कूटर बुक केल्यानंतरही तुम्ही ती खरेदी करतेवेळी व्हेरिअंट आणि त्याच्या रंगात बदल करू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल आणि त्यानंतर तुमच्या आवडीचं मॉडेल सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल.11 / 15ही स्कूटर तुम्हाला EMI वर देखील घेता येणार आहे. यासाठी कंपनीनं काही आर्थिक संस्थांशी करार केला आहे. OLA S1 साठी ईएमआय 2999 रूपये आणि OLA S1 Pro साठी 3199 रूपयांपासून सुरू होणाऱ्या ईएमआयसह ओला फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून लोनची सुविधा देण्यात येत आहे.12 / 15जर तुम्हाला लोनची आवश्यकता नसेल, तर तुम्ही व्हेरिअंटनुसार 20 हजार किंवा 25 हजार रूपयांचं अॅडव्हान्स पेमेंटही करू शकता. पूर्ण रक्कम भरल्यानंतरच तुम्हाला त्याचं चलान मिळेल. डाऊनपेमेंट आणि अॅडव्हान्स हे रिफंडेबल असलं तरी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्कूटरच्या डिलिव्हरीची तारीख देण्यात येईल.13 / 15ओला आणि ओला इलेक्ट्रीक या अॅपचा वापर करून तुम्ही विमा पर्याय निवडू शकता. रजिस्ट्रेशनच्या वेळी 1 वर्षाची बेस पॉलिसी म्हणजे ओन डॅमेज आणि 5 वर्षांचा इन्शुरन्स अनिवार्य आहे. त्यानंतरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 14 / 15Ola इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कंपनीनं 3.9kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसंच या स्कूटरची इलेक्ट्रीक मोटर 8.5kW चा पीक पॉवर जनरेट करते. दरम्यान 750W क्षमतेच्या पोर्टेबल चार्जरच्या माध्यमातून ही बाईक जवळपास 6 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते.15 / 15तर दुसरीकडे कंपनीनं यासाठी एक सुपर चार्जरही आणला आहे. सुपर चार्जरच्या माध्यमातून ही स्कूटर केवळ 18 मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. एकदा ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 180 ते 190 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. इतकंच नाही तर ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications