Ola Electric Scooter will get a subsidy of more than Rs 50,000; Learn how to benefit ...
Ola Electric Scooter वर मिळेल 50,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी; जाणून घ्या कसा होईल फायदा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 3:12 PM1 / 10Ola EV subsidy: भारतात सध्या स्वातंत्र्य दिनाबरोबरच लोक एका इलेक्ट्रीक स्कूटरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती आहे Ola Electric Scooter. ओला कंपनीची पहिली स्कूटर येत्या 15 ऑगस्टला लाँच होणार आहे. आतापर्यंत या स्कूटरला लाखावर बुकिंग मिळाल्या आहेत. 2 / 10जर तुम्हाला ओला स्कूटर घ्यायची आहे आणि जर तुम्ही बुकिंग केले असेल तर या स्कूटरवर 50000 रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकता. हा लाभ तुम्हाला FAME II सबसिडी आणि राज्याची सबसिडी मिळून होऊ शकतो. चला तर मग, जाणून घेऊया या इलेक्ट्रीक स्कूटरवर हा फायदा आणि कमी किंमतीत ती कशी खरेदी करता येईल हे पाहू. (Ola scooter will get more than 50000 rs subsidy by central government.)3 / 10ओला इलेक्ट्रिक स्कूटरची दोन मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे. Ola S1 बेस मॉडेल आणि Ola S1 Pro पावरफूल मॉडेल असेल. बेस मॉडेलला 2kW motor आणि दुसऱ्या मॉडेलला 4kW motor मिळण्याची शक्यता आहे. 4 / 10केंद्राने FAME-II स्कीममध्ये मिळणारे फायदे पुन्हा बदलले आहेत. यानुसार प्रति किलोवॉट आर (Per kWh) 15,000 रुपये सबसिडी दिली जाणार आहे. यामुळे ओलाच्या पहिल्य़ा व्हेरिअंटवर 30000 रुपये वाचतील. तर दुसऱ्या मॉडेलवर 50000 हजारहून अधिक रुपये वाचणार आहेत. 5 / 10जर ओलाची ही स्कूटर दीड लाखात लाँच झाली तर त्याची किंमत सबसिडीमुळे लाख होईल. याचबरोबर राज्य सरकारांनीही सबसिडी देण्याची तरतूद केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात सारखी राज्ये आहेत. यामुळे हा लाभ आणखी 20 हजारांनी वाढण्याची शक्यता आहे.6 / 10ओलाच्या या स्कूटरबाबत बोलायचे झाले तर 7 इंचाची टचस्क्रीन मिळेल. यात नेव्हिगेशन सपोर्टही असेल. तसेच यासाठी 4जी सपोर्टही मिळेल. यामध्ये तुम्ही कॉलिंग, युट्युबसारखे फिचर वापरू शकाल. 7 / 10जर ही स्कूटर बिघडली किंवा काही समस्या आली तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आता ओलाची सर्व्हिस कशी असेल ते पहावे लागणार आहे. मेकॅनिक घरी येऊन दुरुस्त करणार की सर्व्हिस सेंटर उघडणार ते येत्या काळात स्पष्ट होईल. यामध्ये ‘Find My Scooter’ फीचरदेखील असेल. 8 / 10Ola Electric Scooter ला रिव्हर्स मोड देखील असणार आहे. यामुळे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये किंवा मागे चढ असताना स्कूटर पायांनी मागे ओढावी लागणार नाही. खासकरून महिलांना या फिचरचा जास्त फायदा होईल. 9 / 10Ola Electric Scooter एका चार्जमध्ये 150 किमी रेंज असेल. घरी चार्ज करण्यासाठी 5 तास आणि Hyper Charging Station वर 1 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज केली जाऊ शकते. 10 / 10Ola Electric Scooter चा टॉप स्पीड हा बॅटरी कॅपॅसिटीनुसार 45kmph ते 70kmph एवढा असू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications