ola electric scooters bumper sale crossed 1100 crore mark next sale on november 1
Ola Electric स्कूटर्सचा धमाका; दोन दिवसांत 1100 कोटींची विक्री By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 2:32 PM1 / 9नवी दिल्ली : ओला (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 (S1) आणि ओला एस 1 प्रोची (Ola S1 Pro) विक्री 15 सप्टेंबरपासून सुरू झाली, या विक्रीला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांत 1100 कोटी रुपयांची विक्री झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. 2 / 9पहिल्या दिवशी ओला स्कूटरची 600 रुपयांची विक्री झाली होती. त्यामुळे कंपनीचा दावा आहे की, भारतातील संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योगात हा विक्री ऑर्डरचा आकडा एका दिवसाच्या विक्रीपेक्षा जास्त आहे.3 / 9स्कूटरचे बुकिंग खुले असेल, नवीन खरेदीदारांसाठी पुढील विक्री 1 नोव्हेंबरला आयोजित केली जाईल. बुकिंगची रक्कम आणि बुकिंग प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही. बुकिंग फक्त 499 रुपयांमध्ये होईल, असे कंपनीने सांगितले. 4 / 9याचबरोबर, ओला स्कूटर खरेदीचा पहिला दिवस आमच्यासाठी आणि वाहन उद्योगासाठी अभूतपूर्व होता. तर पहिला दिवस संपला तिथूनच दुसरा दिवस पुढेच गेला. ग्राहकांनी आमच्या उत्पादनांसाठी जो उत्साह दाखवला तो कायम राहिला, असे ओला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी सांगितले.5 / 9कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल म्हणाले की, एकूण 2 दिवसात आम्ही 1100 कोटी रुपयांची विक्री केली आहे! हे केवळ मोटार वाहन उद्योगात अभूतपूर्व नाही तर भारतीय ई-कॉमर्स इतिहासातील एकाच उत्पादनासाठी एकाच दिवसात सर्वाधिक विक्री (मूल्यानुसार) आहे! आपण खऱ्या अर्थाने डिजिटल इंडिया मध्ये जगत आहोत.6 / 9ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे, तर एस 1 प्रोची किंमत 1.30 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूममधील आहेत आणि राज्य अनुदानावर अवलंबून बदलू शकतात. ओला ए 1 ची सिंगल चार्जिंगनंतर रेंज 120 किमी आहे, तर एस 1 प्रो ची रेंज 180 किमी आहे. एस 1 प्रो ला मोठी बॅटरी मिळते, तर त्याची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. ओला एस 1 मॉडेलमध्ये 2.98 केडब्ल्यूएच बॅटरी आहे, तर एस 1 प्रोमध्ये 3.97 केडब्ल्यूएच बॅटरी आहे.7 / 9दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात, ज्यामध्ये नेव्हिगेशनचे देखील फीचर मिळते. डिस्प्ले 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे आणि वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीसाठी ओलाने 10 हजार महिलांना काम दिले आहे. तसेच वर्षाला 20 लाख स्कूटर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेतही या स्कूटरची निर्यात केली जाणार आहे.8 / 9ओलाने डायरेक्ट टू होम सेल्स मॉडेलची निवड केली आहे आणि कोणतेही फिजिकल स्टोअर उघडले नाही. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून 499 रुपयांची बुकिंग रक्कम भरून स्कूटर बुक करू शकतात. ग्राहकांना 'आधी रिझर्व्ह करा, आधी मिळवा' या तत्त्वावर डिलिव्हरी मिळेल. कंपनीच्या मते, ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट ड्राइव्ह आणि डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरू होईल. 9 / 9तसेच कंपनी ग्राहकांना त्यांचे स्कूटर खरेदी करण्यासाठी लोन आणि ईएमआय सुविधाही देत आहे, त्यासाठी अनेक कंपन्यांशी करार केला आहे. ओला इलेक्ट्रिकने 7 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस 1 स्कूटर प्रति महिना 2,999 रुपयांच्या समान मासिक हप्त्यावर (ईएमआय) उपलब्ध होईल. तर, या इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 प्रोच्या अॅडव्हान्स व्हर्जनसाठी ईएमआय 3,199 रुपयांपासून सुरू होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications