Ola Electric to start delivery in new cities. Check if yours is on the list
आता 'या' शहरांतील ग्राहकांना मिळणार Ola इलेक्ट्रिक स्कूटर, लगेच करा चेक... By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 3:52 PM1 / 8नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक ग्राहकांसाठी चांगला टाइम सुरू झाला आहे, कारण कंपनी S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी सज्ज आहे. चेन्नई आणि बंगळुरू येथील ग्राहकांना आधी 100 इलेक्ट्रिक स्कूटर दिल्या. यानंतर कंपनी आता मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि विशाखापट्टणम येथील ओला ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी सुरू करणार आहे.2 / 8ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी डिलिव्हरी मिळाल्यानंतर खूश झालेल्या ग्राहकांचे काही फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकने 15 ऑगस्ट 2021 रोजी Ola S1 आणि Ola S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या. 3 / 8यासोबतच या स्कूटरची बुकिंग सुरू झाली आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये या स्कूटरच्या खरेदीची विंडो उघडण्यात आली. त्यानंतर 10 नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांमध्ये स्कूटरची टेस्ट राइड सुरू करण्यात आली. अखेरीस, 15 डिसेंबर रोजी म्हणजेच लाँचिगच्या बरोबर 4 महिन्यांनंतर, लोकांना पहिल्या ओला स्कूटरची डिलिव्हरी मिळाली.4 / 8ईटीने कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वरुण दुबे यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, ओला स्कूटरची पुढील खरेदी विंडो लवकरच उघडली जाणार आहे. ते म्हणाले की, कंपनीने ओला स्कूटरचे 499 रुपयांचे बुकिंग कधीच थांबवले नाही. या बुकिंगमुळे लोक ओला स्कूटर खरेदी करू शकतात. आता पुढील खरेदीची विंडो जानेवारी 2022 महिन्याच्या अखेपर्यंत उघडली जाईल.5 / 8ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 व्हेरिएंटची किंमत 1 लाख रुपये आहे, तर S1 Pro व्हेरिएंटची किंमत 1. 30 लाख रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूम आणि राज्य सबसिडीपूर्वीची आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देखील देशातील विविध राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या सबसिडीनुसार बदलू शकते.6 / 8Ola S1 व्हेरिएंट एकदा फुल चार्ज केल्यानंतर 121 किमी अंतर कापू शकते. तर S1 Pro प्रकार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 181 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. S1 व्हेरिएंट 3.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेगाने धावते, तर S1 Pro व्हेरिएंट 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.7 / 8S1 आणि S1 Pro दोन्ही मॉडेल्स अनेक फीचर्ससह येतात. स्कूटर बिना चावी असून मोबाइल फोन अॅप वापरून सुरू करता येते. यामध्ये मल्टी ड्रायव्हर प्रोफाइल तयार करता येतात. भविष्यात, कंपनी अॅप अपडेटद्वारे पॅरेंटल कंट्रोल आणि जिओफेन्सिंग यांसारखी अनेक फीचर्स वाढवू शकते. या स्कूटरमध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर उपलब्ध आहेत, म्हणजेच तुम्ही पोहोचताच स्कूटर अनलॉक होईल. ओला स्कूटरचे बूट उघडणे आणि बंद करण्याच्या ऑप्शनसह जीपीएस आणि कनेक्टिव्हिटीची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे.8 / 8ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर ई-स्कूटरची बॅटरी केवळ 18 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करते. यामुळे स्कूटरची बॅटरी 75 किमीच्या अर्ध्या सायकलची रेंज कव्हर करण्यासाठी पुरेशी चार्ज होईल. कंपनीच्या वेबसाइटमध्ये ज्या शहरांमध्ये चार्जर स्टेशन लावण्यात येणार आहेत, त्याची संपूर्ण यादी देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications