OLA Launched New EV Scooter Range; Price starts from ₹39,999 only
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू... By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 6:01 PM1 / 7 OLA New Electric Scooter Range : देशातील आघाडीची EV टू-व्हिलर उत्पादक कंपनी Ola इलेक्ट्रिकने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कंपनीने नवीन 'Gig आणि S1 Z' स्कूटर रेंज लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. सामान्यांसाठी/ज्यांना कमी पैशात इलेक्ट्रिक स्कूटर हवी आहे, अशांना इलेक्ट्रिक मोबिलिटी सुलभ व्हावी, यासाठी या स्कूटर्स लॉन्च करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.2 / 7 विशेष बाब म्हणजे, या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर रेंजची सुरुवातीची किंमत केवळ 39,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या स्कूटरचे अधिकृत बुकिंगदेखील सुरू झाले असून, फक्त 499 रुपयांमध्ये ही स्कूटर बुक करता येईल. 3 / 7 कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटरच्या नवीन श्रेणीमध्ये Ola Gig, Ola Gig+, Ola S1 Z आणि Ola S1 Z+ यांचा समावेश आहे. यांच्या किंमती अनुक्रमे 39,999 रुपये, 49,999 रुपये, 59,999 रुपये आणि 64,999 रुपये (एक्स-शोरूम) आहेत. या स्कूटरची बॅटरी काढता येईल, ज्यामुळे तुम्ही कुठेही आरामात चार्जिंग करू शकता. 4 / 7 Ola Gig: ओला गिग शॉर्ट राइड्ससाठी डिझाइन केली आहे. या स्कूटरमध्ये मजबूत फ्रेम, डिझाइन, पुरेशी रेंज, काढता येण्याजोगी बॅटरी, पुरेशी पेलोड क्षमता आणि उत्तम सुरक्षा असल्याचा दावा केला जात आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने 1.5 kWh क्षमतेची रिमूव्हेबल बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एका चार्जवर 112 किमी (IDC-प्रमाणित) ड्रायव्हिंग रेंज देईल. 5 / 7 Ola Gig+: ही स्कूटर जड पेलोडसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या कामगारांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ओला गिग+ स्कूटर कमाल 45 किमी/तास वेगाने धावू शकते. कंपनीने यात 1.5 kWh क्षमतेची रिमूव्हेबल सिंगल/ड्युअल बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्कूटरची सिंगल बॅटरी 81 किमीची रेंज देते, तर दोन बॅटरीसह ही स्कूटर 157 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. 6 / 7 Ola S1 Z: कंपनीने खासगी वापरासाठी S1 Z बनवली आहे. या स्कूटरमध्ये 1.5 kWh रिमूव्हेबल ड्युअल बॅटरी आहे, ज्याची IDC-प्रमाणित श्रेणी 75 किमी (146 किमी x 2) आहे. याचा टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे. यात एलसीडी डिस्प्ले आणि फिजिकल की आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने 2.9 kW क्षमतेची हब मोटर दिली आहे.7 / 7 Ola S1 Z+: कंपनीने Ola S1 Z Plus मध्ये मजबूत डिझाइन, उच्च पेलोड क्षमता आणि मल्टीपर्पज स्टोरेजची सुविधा दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, वैयक्तिक स्कूटर असण्यासोबतच याचा वापर हलक्या व्यावसायिक वापरासाठीही केला जाऊ शकतो. यात 1.5 kWh क्षमतेची काढता रिमूव्हेबल ड्युअल बॅटरी आहे, ज्याची IDC-प्रमाणित श्रेणी 75 किमी (146 किमी x 2) आहे. त्याचा टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications