शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रतीक्षा संपली! Ola S1 आणि S1 Pro ची पुन्हा बुकिंग सुरू, फक्त 499 रुपयांत करा बुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 6:05 PM

1 / 9
नवी दिल्ली : ओला एस 1 (Ola S1) आणि एस 1 प्रो (S1 Pro) बुकिंगची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ओला इलेक्ट्रिकने आपल्या या इलेक्ट्रिक स्कूटरचे (Ola Electric Scooter)बुकिंग पुन्हा सुरू केले आहे.
2 / 9
ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ओला एस 1 आणि एस 1 प्रो स्कूटरचे बुकिंग करू शकतात. यासाठी 499 रुपयांची टोकन रक्कम भरावी लागेल, जी पूर्णपणे रिफंडेबल आहे.
3 / 9
यापूर्वी कंपनीकडून सांगण्यात आले होते की, सप्टेंबर 2021 मध्ये फक्त दोन दिवसांत ओला इलेक्ट्रिकने 1,100 कोटी रुपयांची विक्री केली. आता ओला एस 1 आणि एस 1 प्रोची पुढील सेल्स विंडो 1 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू होईल. दरम्यान, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री ऑनलाईन करत आहे.
4 / 9
ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस 1 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. त्याचबकोबर, एस 1 प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये आहे. तसेच, ओला एस 1 व्हेरिएंटमध्ये पॉवरसाठी 2.98 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तसेच, ओला एस 1 प्रो व्हेरिएंटमध्ये 3.97 kWh चा बॅटरी पॅक मिळत आहे.
5 / 9
वेगाबद्दल बोलायचे झाले तर या इलेक्ट्रिक स्कूटरला टॉप स्पीड 115 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच्या एस 1 प्रो व्हेरिएंटला 115 किमी प्रतितासाचा टॉप स्पीड मिळतो. एस 1 व्हेरिएंटला 90 किलोमीटर प्रतितासाचा टॉप स्पीड मिळतो.
6 / 9
चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर ओला एस 1 व्हेरिएंट एकदा फुल चार्च केल्यानंतर 121 किलोमीटरची रेंज देते. तर एस 1 प्रो व्हेरिएंट सिंगल चार्ज केल्यानंतर 181 किलोमीटर चालते. एस 1 व्हेरिएंट 3.6 सेकंदात 0-40 किमी प्रति तास वेग पकडते. तर एस 1 प्रो व्हेरिएंट 3 सेकंदात 0-40 किलोमीटर प्रति तास वेग पकडते.
7 / 9
दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात, ज्यामध्ये नेव्हिगेशनचे देखील फीचर मिळते. डिस्प्ले 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे आणि वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे.
8 / 9
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीसाठी ओलाने 10 हजार महिलांना काम दिले आहे. तसेच वर्षाला 20 लाख स्कूटर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेतही या स्कूटरची निर्यात केली जाणार आहे.
9 / 9
ओलाने डायरेक्ट टू होम सेल्स मॉडेलची निवड केली आहे आणि कोणतेही फिजिकल स्टोअर उघडले नाही. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून 499 रुपयांची बुकिंग रक्कम भरून स्कूटर बुक करू शकतात. ग्राहकांना 'आधी रिझर्व्ह करा, आधी मिळवा' या तत्त्वावर डिलिव्हरी मिळेल.
टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनAutomobileवाहन