शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OLA Scooter बुक केलीय का? उद्या खरेदीची पहिली संधी; जाणून घ्या प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 10:08 AM

1 / 10
ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरसाठी (OLA Electric Scooter) बुकिंग केली असेल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे. 8 सप्टेंबरला ओलाच्या स्कूटरची पहिली ऑनलाईन विक्री केली जाणार आहे. यासाठी शोरुममध्ये वगैरे जाण्याची गरज राहणार नाहीय. ओलाने स्कूटरसाठी बुकिंग केलेल्या ग्राहकांना मेसेज पाठविले आहेत. यामध्ये एक लिंक देण्यात आली असून त्यामध्ये ही स्कूटर कशी खरेदी करायची? कर्ज कसे मिळवायचे? कधी डिलिव्हर होईल आदी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. (How to Purchase Ola Electric Scooter Ola S1. )
2 / 10
Ola S1 खरेदी करण्याची विंडो स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच Ola S1 Pro देखील उपलब्ध होण्याची शक्यता असून हे दोन व्हेरिअंट 10 रंग आणि दोन फिनिशेस मधून निवडता येणार आहेत. यासाठी तुम्हाला काय तयारी करावी लागेल, हे देखील कंपनीने सांगितले आहे.
3 / 10
ओलाने कर्जावर स्कूटर घेणाऱ्यांसाठी ओला फायनान्स सर्व्हिस (by Ola Financial Services (OFS)) सुरु केली आहे. Ola S1 खरेदी करण्यासाठी तुम्ही अॅडव्हान्स देखील देऊ शकता. कर्ज काढून ओला स्कूटर घेण्यासाठी कंपनीने IDFC First Bank, HDFC, आणि TATA Capital सोबत हातमिळवणी केली आहे. यानुसार ईएमआय हे 2999 (for Ola S1) पासून सुरु होत असून Ola S1 Pro साठी 3199 रुपयांचा ईएमआय ठेवण्यात आला आहे.
4 / 10
HDFC Bank आपल्या ग्राहकांना काही मिनिटांत प्री अॅप्रूव्हड लोन देत आहे. यासाठी ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अॅप (Ola Electric App) वापरावे लागणार आहे. तर TATA Capital आणि IDFC First Bank डिजिटल केवायसी प्रक्रियेतून लोन देणार आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता आदी तयार ठेवावे लागणार आहे. (OLA Scooter booked? know PURCHASE PROCESS in Marathi.)
5 / 10
जर तुम्हाला कर्जाची गरज नसेल तर तुम्ही 20000 रुपये अॅडव्हान्स भरून Ola S1 आणि 25000 रुपये भरून Ola S1 Pro बुक करू शकणार आहात. उरलेली रक्कम ही स्कूटर डिलिव्हर होताना देता येणार आहे. डाऊन पेमेंट आणि अॅडव्हान्स हे रिफंडेबल असणार आहे. स्कूटर जोवर ओला फॅक्टरीतून शिप होत नाही, तोवर बुकिंग रद्द करता येणार आहे.
6 / 10
ओला स्कूटरचा इन्शुरन्स तुम्ही ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अॅपवरून काढू शकता. सध्या कंपनीने ICICI Lombard चा इन्शुरन्स देऊ केला आहे. या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये 1 वर्षाचा ओन डॅमेज आणि 5 वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुर्स दिला जाणार आहे. याची किंमत वेगळी असू शकते. तसेच यामध्ये तुम्ही Personal Accident Cover, Zero Depreciation आणि Roadside Assistance अॅड ऑन घेऊ शकता.
7 / 10
कोणतीही स्कूटर, बाईक किंवा कार ही टेस्ट राईड घेतल्याशिवाय आपण घेत नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या देखील फसवितात. राईड हँडलिंग, तुम्हाला कम्फर्टेबल आहे का, फिचर्स काय आहेत हे पाहिल्याशिवाय घेऊ नका. ओला ऑक्टोबर पासून टेस्ट राईड आयोजित करणार आहे. टेस्ट राईड घेतल्यानंतरच निर्णय घ्या. तसेच टेस्ट राईड घेतली की त्यानंतर फॅक्टरीतून शिप होईस्तोवर तुमच्याकडे बुकिंग रद्द करण्याचा पर्याय आहे.
8 / 10
Ola S1 ची डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार आहे. थेट घरी तुम्हाला की स्कूटर मिळणार आहे. शिप झाल्यावर उरलेली रक्कम भरावी लागणार आहे. जर तुम्ही पैसे देण्यास विलंब केला तर तुम्हाला मिळणारी स्कूटर दुसऱ्या ग्राहकाला दिली जाणार आहे. यानंतर तुम्हाला विलंबाने दुसरी स्कूटर दिली जाईल.
9 / 10
ओला स्कूटरला कंपनीने तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे. बॅटरीला तीन वर्षां अनलिमिटेड किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच अन्य स्कूटरच्या पार्टवर तीन वर्षे किंवा 40000 किमी जे पहिले असेल ते. सर्व्हिसिंग तीन ते सहा महिन्यांनी असणार आहे. यासाठी ओला अॅप किंवा स्कूटर तुम्हाला याची माहिती देईल.
10 / 10
सरकारी सबसिडी मिळविण्यासाठी तुम्हाला आधार, पॅन, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे. जर तुम्ही आधी ईव्हीसाठी सबसिडी घेतली असेल तर तुम्हाला दुसरी सबसिडी दिली जाणार नाही. तुमच्याकडे आधीची ईव्ही असेल तर त्याचे ईन्व्हॉईस सादर करावे लागणार आहे. (Have you reserved your Ola Scooter? Then brace yourselves for priority purchase on 8th September. To know more)
टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन