ola shuts down these 2 services within 1 year the focus will be on the ev segment
OLA कडून एका वर्षात 'या' दोन सर्व्हिस बंद! आता EV सेगमेंटकडे असणार जास्त फोकस! By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 2:07 PM1 / 7नवी दिल्ली : डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीदरम्यान इलेक्ट्रिक वाहने लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. ऑटोमोबाईल कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत. 2 / 7आता ओला कंपनी देखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रयत्न करत आहे. ओलाने घोषणा केली आहे की, कंपनी आता क्विक कॉमर्स (Quick Commerce) व्यवसाय आणि ओला डॅश युज्ड कार (Ola Dash Used Cars) बंद करत आहे.3 / 7दरम्यान, कंपनीने हा व्यवसाय 1 वर्षापूर्वीच सुरू केला होता. या संदर्भात कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ओलाने आपल्या प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन केले आणि विचार केल्यानंतर ओला डॅश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 / 7ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या कार व्यवसायाला एक नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्नशील असून आपली गो-टू मार्केटिंग धोरण मजबूत करत आहे, कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्व्हिस नेटवर्क आणि इलेक्ट्रिक विक्री लक्षात घेऊन ओलाच्या कारची पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान तयार केले जात आहे. 5 / 7यावरून ओलाचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो की, कंपनीची इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे.ओला कंपनीच्या मते, ओला इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये तिच्या कमाईचा 50 टक्के भाग घेते. नुकत्याच जाहीर झालेल्या काही आकडेवारीतूनही ही वस्तुस्थिती योग्य ठरते. 6 / 7ओला कंपनीने एप्रिल ते मे 2022 दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीमध्ये एकूण 500 कोटींचा महसूल मिळवला आहे. याचबरोबर, कंपनीने असेही म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस हा महसूल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 7834 कोटींचा महसूल मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.7 / 7ओला कंपनीशी संबंधित आणखी एक गोष्ट म्हणजे, आता ओला इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रातही प्रवेश करण्याचा विचार करत आहे. काही वेळापूर्वी आयोजित एका कार्यक्रमात ओलाने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारपैकी एकाची झलक शेअर केली. रिपोर्ट्सनुसार, 15 ऑगस्ट रोजी कंपनी यासंबंधीची माहिती देऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications