शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ola vs Simple One: सिंपल वनने ओला इलेक्ट्रीक स्कूटरला किंमत, रेंजमध्ये पछाडले; जाणून घ्या दोन्हींतील फरक...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 11:47 AM

1 / 13
प्रसिद्ध ओला कंपनीच्या Ola Scooter आणि स्टार्टअप कंपनी Simple Energy च्या सिंपल वन Simple One इलेक्ट्रिक स्कूटरने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनीच एन्ट्री केली आहे. (compare the price, range, specifications, top speed and the features of the Ola S1 and Simple One e-scooters)
2 / 13
ओलाने इ स्कूटरचे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. तर सिंपल वनचा एकच व्हेरिअंट आहे. ओलाच्या एस१ ची किंमत 99,999 रुपये तर एस1 प्रोची किंमत एक लाख 29 हजार 999 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तर सिंपल वनची किंमत 1,09,999 रुपये ठेवण्यात आली आहे. इथे सिंपल वनने बाजी मारली आहे. (who is best scooter? Ola electric scooter vs Simple One electric scooter)
3 / 13
सबसिडी मिळून ओलाची एस१ ची किंमत महाराष्ट्रात 94999 रुपये, एस१ प्रोची किंमत 124999 रुपये ठेवण्यात आली आहे. जी महाग आहे. तर सिंपल वनची स्कूटर राज्यात 103555 रुपयांच्या आसपास मिळणार आहे. जी रेंज आणि किंमतीचा विचार करता परवडणारी आहे. (Ola electric scooter S1 Pro price in Delhi Mumbai Kolkata Bangalore other states)
4 / 13
सिंपल वनने कमी किंमतीत जास्त रेंज देत ओलाच्या स्कूटरला जोरदार टक्कर दिली आहे. ओलाच्या एस१ मध्ये 2.98 kWh battery pack देण्यात आले आहे. तर 121km ची रेंज देते. Ola S1 Pro मध्ये 3.97 kWh battery pack देण्यात आले आहे. रेंज 181km देण्यात आली आहे.
5 / 13
Simple One मध्ये 4.8kW battery pack देण्यात आले असून 4.8kW motor देण्यात आली आहे. ही स्कूटर 201km ची इको मोडमध्ये रेंज देते तर चांगला रस्ता असेल तर 236km ची रेंज देते. या बाबतीतही सिंपलने ओलाला मात दिली आहे.
6 / 13
ओलाची एस१ स्कूटर पूर्ण चार्ज करण्यासाठी 4 तास 48 मिनिटे लागतात. Hypercharger ने चार्ज करताना 18 मिनिटांत 75 किमीची रेंज मिळते. Ola S1 Pro 100 टक्के चार्ज करण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात.
7 / 13
सिंपल वन चार्ज करण्यासाठी सिंपल लूप चार्जरद्वारे 60 सेकंदांत 2.5 किमी रेंज देते. म्हणजेच 100 टक्के चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात.
8 / 13
Simple One मध्ये 30-litre boot space देण्यात आली आहे. OLA S1 पेक्षा ही 6 लीटरने कमी आहे. ओलाच्या स्कूटरमध्ये hill hold control, cruise control व voice assist हे वेगळे फिचर्स आहेत. तसेच रिव्हर्स गिअरही आहे.
9 / 13
सिंपल वन ही चार रंगात उपलब्ध आहे. Brazen Black, Azure White, Brazen White आणि Namma Red हे रंग आहेत. (Simple One electric bike with 236 km range launched: Check price, specs, booking details and more)
10 / 13
ओला एस१ स्कूटर पाच रंगांत येते, तर एस१ प्रो Red, Sky Blue, Yellow, Silver, Gold, Pink, Black, Navy Blue, Grey आणि White या दहा रंगांत येते.
11 / 13
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही कंपन्यांकडे अनुभव अजिबात नाही. ओला ही कॅब सेवा पुरविते. यामुळे नाव मोठे आहे. तर सिंपल एनर्जी नवखी आहे. ओला होम डिलिव्हरी, होम सर्व्हिस देणार आहे. तर सिंपल वन एक्सपिरिअंस आउटलेट उघडणार आहे.
12 / 13
ओलाकडे प्रचंड पैसा आहे, त्यामुळे ओला जागोजागी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारू शकते. त्याचा वापर ओलाला कॅब सेवा आणि स्कूटर चार्जसाठी होणार आहे. परंतू सिंपलला हळूहळू इव्ही स्टेशन उभारण्याबरोबरच सेवेसाठी दालनेही उघडावी लागणार आहेत.
13 / 13
सिंपलकडे हाय रेंज आणि कमी किंमत हीच एक जमेची बाजू आहे. यावर कंपनीची स्कूटर खरी उतरली तर ग्राहकांचा ओढा जास्त रेंजच्या स्कूटरकडे वळणार आहे. कारण सारखे सारखे चार्ज करण्याची कटकट संपेल आणि कमी किंमतीतही ईलेक्ट्रीक स्कूटर मिळेल. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.
टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड