Old Car selling Tips: do you want a good price for your used car, see tips
Old Car selling Tips: जुनी कार विकायची असेल तर...; चांगली किंमत येण्यासाठी हे जरूर करा By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 2:09 PM1 / 8कोरोना काळात एकीकडे नवीन कार मिळत नसल्याने जुन्या कारना जबरदस्त मागणी वाढली आहे. परंतू बाजारात वापरलेल्या कारचाही म्हणावा तेवढा पुरवठा होत नाहीय. यामुळे किंमती वाढलेल्या आहेत. मागणी जास्त आणि कार कमी अशी स्थिती सध्या सेकंड हँड बाजाराची आहे. 2 / 8अशा परिस्थितीत तवा गरम आहे, भाकरी शेकून घ्यायचे काम अनेकजण करत आहेत. जुन्या कारना चांगली किंमत येत आहे. परंतू जर तुमची कार चांगली असेल तर ही किंमत मिळत आहे. यामुळे तुम्हाला पण जर चांगली किंमत हवी असेल तर कार चकाचक दिसणे गरजेचे आहे. 3 / 8तुम्ही तुमची कार चकाचक केली तर तुम्हाला आणखी जास्त चांगली किंमत मिळेल. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. जे तुमच्या जुन्या कारची किंमत आपोआप वाढवत जातील. 4 / 8गाडी विकण्याआधी तुमच्या गाडीवर कोणते स्क्रॅच आहेत का ते पहा. जर असतील तर ते काढून घ्या. गाडी रस्त्यावर चालविताना इकडे तिकडे घासतेच. पण गिऱ्हाईकाला किंवा एजंटला तेवढेच कारण मिळते. यामुळे स्क्रॅच काढून गाडी विकायला किंवा दाखवायला जा. 5 / 8गाडी विकताना आतून आणि बाहेरून चांगली स्वच्छ करून घ्या. यामुळे पाहणाऱ्यालाही पहिल्याच फटक्यात आवडेल. त्याला विश्वास वाटेल की कार चांगल्या स्थितीत ठेवली आहे. बॉडीवर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर गिऱ्हाईक नाखूश होईल आणि खरेदी करणार नाही. 6 / 8कार घेताना तिची ट्रायल घेतली जाते. गिअर हार्ड असेल, क्लच हार्ड असेल, ब्रेकिंग कमी असेल, लाईट बंद असेल, स्टेअरिंग नादुरुस्त असेल अशा काही समस्या असतील तर गिऱ्हाईक गाडी घेत नाही किंवा ते कारण सांगून किंमती कमी करू शकते. तुमची गाडी स्मूथ चालली तर गिऱ्हाईक खूश होते व पाच दहा हजारासाठी विचार करत नाही. 7 / 8कारची जेवढी गरजेची कागदपत्रे आहेत ती सर्व पूर्ण करावीत. सर्व कागदपत्रे जवळ ठेवावीत. तसेच गाडीचे कोणतेही ट्रॅफिक नियम तोडल्याचे चलन पेंडिंग ठेवू नये. वेळच्यावेळी सर्व्हिसिंग केल्याच्या पावत्यादेखील सोबत ठेवाव्यात. असे केल्यास पहायला येणारा जास्त किंमत देऊ शकतो.8 / 8एखादा व्यक्ती कारमध्ये बसताना आतील इंटिरिअर पाहतो. आतील एसीची, म्युझिक सिस्टिमची बटने खराब झालेली असतील तर त्याकडे लक्ष जाते. यामुळे ते दुरुस्त करून घ्यावे. जर मातीचे किंवा अन्य कसले डाग असतील तर ते घालवावेत. आणखी वाचा Subscribe to Notifications