शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Old Car Selling Tips: सेकंड हँड कार जास्त किंमतीला विकायची असेल तर; या टीप्स नक्की फॉलो करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 15:58 IST

1 / 9
भारतात कोरोनामुळे जुन्या कारचे मार्केट चांगलेच वधारले आहे. आता प्रत्येकाला आपल्याकडे कार का असावी याची प्रचिती आली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाला, सार्वजनिक वाहतूक बंद, खासगी स्कूटर नेली तर फटके शिवाय कोरोना होण्याचा धोका यामुळे बंदिस्त कार असेल तर निदान कोरोनाचा तरी धोका नाही. तसेच गावी जायचे झाले तर पहिल्या लॉकडाऊनमध्ये साऱ्यांनीच अनुभवले की कसे चालत, सायकल, हातगाड्यांवरून हाल हाल झाले. (Used Car Selling Tips: will get more price for your ar while selling)
2 / 9
यामुळे देशात सध्या सेकंडहँड कारचे मार्केट (Second Hand Car) चांगलेच खुलले आहे. तसेच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले यामुळे त्यांना त्यांचे वाहनांचे हप्ते भरणे कठीण झाले. यामुळे तडकाफडकी इच्छा नसताना देखील कार विकाव्या लागल्या आहेत. यासाठी त्यांना कमी किंमत देखील मिळाली आहे. म्हणजे नुकसान झाले आहे. अशावेळी तुम्हाला जर कार विकायची असेल तर काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 9
जर तुम्हाला तुमची कार चांगल्या किंमतीला किंवा जास्त किंमतीला विकायची असेल तर या टीप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. नाहीतर खालीफुकट तुमची कार कमी किंमतीत विकावी लागेल. चार-दोन हजार रुपये जास्त आले तर तुम्हालाच फायदा होईल का नाही.
4 / 9
कार विकण्याआधी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कारची खरी विक्री किंमत जाणून घ्यावी लागेल. यासाठी बाजारात सेकंड हँड कार विकत घेणाऱे डीलर, व्हॅल्युएशन करणाऱ्या कंपन्य़ा आहेत. त्यापेक्षा जास्त किंमतीत तुमची कार ते दुसऱ्या ग्राहकाला विकणार हे नक्की.
5 / 9
यामुळे त्यांच्याकडून तुमच्या कारची किंमत किती होतेय ते जाणून घ्यायचे. त्यापेक्षा जास्त किंमत सांगून त्यासाठी ग्राहक पहायचा तुमच्या सोईचे ठरणार आहे. असे केल्यास दोन-पाच हजार नाही तर 25 ते 50 हजार रुपये जास्तीचे तुम्हाला मिळू शकतात.
6 / 9
जुन्या कारला चांगली किंमत येण्यासाठी दुसरी बाब म्हणजे त्या गाडीचे सर्व्हिस रेकॉर्ड. जे नेहमी तुमच्याकडे असायला हवे. सर्व्हिस रेकॉर्ड दाखवून तुम्ही ग्राहकाला या कारचा मेन्टेनन्स वेळोवेळी केला आहे आणि काही समस्या आलेली नाही ते पटवून देऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या जुन्या कारवर चांगली डील मिळू शकते आणि शक्यताही वाढते.
7 / 9
जुन्या कारचा मेन्टेनन्सदेखील गरजेचा आहे. तुमची कार कितीही चांगल्या कंडीशनमध्ये असली तरी ती विकण्याआधी सर्व्हिस सेंटरला किंवा गॅरेजला जाऊन आतील किंवा बाहेरील भागातील समस्या दुरस्त करून घ्यावी. घासली असेल तर डेंटिंग-पेंटिंग करून घ्यावे. एखादा पार्ट निघाला असेल तर तो बसवून घ्यावा. अन्यथा तिथे ग्राहकाचे लक्ष जाते आणि किंमत कमी होते.
8 / 9
कार विकण्यास जाण्याआधी चांगल्या प्रकारे कार वॉशिंग आणि इंटीरिअरचे ड्राय क्लिनिंग करून घ्यावे. कारण घेणाऱ्याला कार चांगली ठेवल्याचे लक्षात यावे व त्याचे पाहताक्षणीच मन व्हावे.
9 / 9
कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा असेल तर घेणाऱ्याची कार कितीही चांगली असली तरी इच्छा होत नाही. कार चांगली ठेवली नाही असा त्याचा समज होतो आणि कारला देखील कमी किंमत मिळते. घाण वास किंवा दर्प येत असेल तर तो घालवण्यासाठी उपाय योजावेत.
टॅग्स :carकारAutomobileवाहन