शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Old Tyres: तुम्ही टाकलेल्या जुन्या टायरचे काय होते? पर्यावरण वाचविण्यासाठी एक मदत कराल?....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 12:38 PM

1 / 7
आजकाल बहुतांश घरांमध्ये वाहन असतेच असते. तुमच्याही घरात वाहन असेल तर काही वर्षांनी वाहनाचे टायर खराब होऊ लागतात हे तुम्हाला माहिती आहेच. या कारणास्तव ते बदलले जातात आणि नवे टायर घातले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्या जुन्या टायरचे काय केले जाते?
2 / 7
जुने टायर तुम्ही घराच्या शेजारी, आंदोलनांमध्ये जाळण्यासाठी, मोठमोठ्या झाडांची खोडे जाळण्यासाठी वापरताना तुम्ही पाहिले आहे. अशामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. तसेच घराशेजारी ठेवलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास होतात व रोगराई पसरते, एवढेच आपल्याला माहिती आहे.
3 / 7
या जुन्या टायरबाबत शासनाचे धोरण आहे. यामध्ये सरकारने नुकतेच काही बदल केले आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) खटल्यासाठी प्रदान केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी देशभरात सुमारे 2,75,000 टायर फेकले जातात. मात्र, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यापक योजना नाही.
4 / 7
भारतात दरवर्षी सुमारे 3 दशलक्ष टाकाऊ टायर पुनर्वापरासाठी आयात केले जातात. 19 सप्टेंबर 2019 रोजी, एंड-ऑफ-लाइफ टायर्स/वेस्ट टायर्स (ELT) च्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रकरणामध्ये, NGT ने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (CPCB) टायर आणि त्यांचे पुनर्वापरासंबंधी तपशीलवार कचरा व्यवस्थापन करण्याचे आणि कचऱ्यासाठी एक योजना सादर करण्याचे निर्देश दिले होते.
5 / 7
टाकाऊ टायर रिसायकल केलेले रबर, क्रंब रबर, क्रंब रबर मॉडिफाइड बिटुमेन (CRMB), पुनर्प्राप्त कार्बन ब्लॅक आणि पायरोलिसिस ऑइल/कोळसा म्हणून पुनर्वापर केले जातात.
6 / 7
2019 च्या अहवालानुसार, NGT प्रकरणातील याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला होता की भारतातील पायरोलिसिस उद्योग कमी दर्जाची उत्पादने तयार करतो. या उत्पादनांवर पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी बंदी घालणे आवश्यक आहे आणि उद्योग जास्त प्रमाणात कर्करोगास कारणीभूत प्रदूषक उत्सर्जित करतो. जे आपल्या श्वसन प्रणालीसाठी खूप हानिकारक आहेत.
7 / 7
यामुळे वाहनाचा टायर बदलल्यास तो त्या टायर दुकानदार किंवा डीलरकडे द्यावा. त्या कंपन्या जुना टायर घेऊन त्यापासून पुन्हा रबर आदी मिळवितात. म्हणजेच रिसायकल करतात.