शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उरले फक्त दोन दिवस; लॉन्च होणार नवीकोरी इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 5:41 PM

1 / 7
या फेस्टिव्हल सीजनमध्ये फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी Citroen भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या 29 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात Citroen C3 इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे. कंपनीने यासाठी एक टीझरही जारी केला आहे. या टीझरमध्ये कंपनीने या इलेक्ट्रिक कारचे मॉडेल किंवा इतर कोणतीही माहिती दिलेली नाही.
2 / 7
Citroen C3 इलेक्ट्रिक असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. Citroen C3 बाबत भारतीय बाजारपेठेत कमालीची उत्सुकता असून, याची थेट स्पर्धा टाटाच्या Tiago EV शी स्पर्धा असेल. 28 सप्टेंबर रोजी Tiago EV लॉन्च होत आहे.
3 / 7
कंपनीने खूप पूर्वीपासून Citroen C3 इलेक्ट्रिकची चाचणी सुरू केली आहे. टेस्टिंगदरम्यान, याचे काही फोटोही समोर आले आहेत. चाचणीदरम्यान कार पूर्णपणे झाकलेली होती, त्यामुळे गाडीची बाहेरील लूक कळू शकला नाही. पण, कारच्या बोनेटवर चार्जिंग पोर्ट दिसून आला होता.
4 / 7
कारचे डिझाइन पाहता, ही Citroen C3 हॅचबॅक असेल असे मानले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, Citron C3 कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन e-CMP वर डिझाइन केले आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत फियाट पांडा इलेक्ट्रिक कारदेखील याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
5 / 7
कंपनीकडून बॅटरीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण रिपोर्टनुसार, Citron C3 EV ICE मॉडेल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे त्याच्या बाहेरील बाजूस फारसा बदल अपेक्षित नाही. ही गाडी अनेक बॅटरी पर्यायांसह ऑफर केली जाऊ शकते.
6 / 7
कंपनी याला 50W बॅटरी पॅकसह लॉन्च करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, या कारची इलेक्ट्रिक मोटर 135 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, या बॅटरीची रेंज 350Kmपर्यंत असेल.
7 / 7
Citroen C3 EV अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. यात क्रूझ कंट्रोल, रिअर डिफॉगर, रिअर वायपर, मॅन्युअल अॅडजस्टमेंटसह ओआरव्हीएम, रिजन ब्रेकिंग, मल्टिपल ड्राइव्ह मोड यांसारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात. इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मते, या कारची किंमत 10 ते 15 लाखांच्या दरम्यान असू शकते.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरCitroen Indiaसिट्रॉन