महिंद्रा स्कॉर्पिओ बनविणारा व्यक्ती जेव्हा नवीन कार घेण्यासाठी शोरुमला आला; आनंद महिंद्रा झाले भावूक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:20 IST
1 / 7देशाच्या ऑटोमोबाईल मार्केटमधील बेताज बादशाहा म्हणजे महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही, या एसयुव्हीने सुमारे दोन दशके राज्य केले आहे. ही कार २००२ मध्ये बनविणारा व्यक्ती काही दिवसांपूर्वीच महिंद्राच्या शोरुममध्ये आला होता. निवृत्तीनंतर नवीन तंत्रज्ञानाची महिंद्राची कार त्यांना खरेदी करायची होती. याच माणसाने महिंद्राच्या आजच्या दणकट कारची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याला पुन्हा आलेले पाहून मालक आनंद महिंद्रा भावूक झाले होते. 2 / 7डॉ. पवन गोएंका असे या व्यक्तीचे नाव होते. अमेरिकेतील जनरल मोटर्समधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. १९९० चा काळ होता. आनंद महिंद्रा यांनी त्यांना आपल्या कंपनीत नोकरी करण्याचा प्रस्ताव दिला. गोएंकांनी विचारू करून हा निर्णय घेतला. त्यांना नाशिकच्या कंपनीच रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा उप मुख्य अधिकारी बनविण्यात आले. 3 / 7गोएंकांनी महिंद्रा कंपनीत नोकरी स्वीकारली खरी परंतू जेव्हा ते तिथे गेले तेव्हा आर अँड डी विभागाची हालत खराब होती. ती परिस्थिती पाहून गोएंका यांना आपण कुठे फसलो, चुकीचा निर्णय घेतला असे वाटले. तरीही त्यांनी आव्हान समजून जबाबदारी स्वीकारली. 4 / 7पुढील १० वर्षांत त्यांनी स्कॉर्पिओसारखी दणकट एसयुव्ही बनविली. कंपनीची उत्पादने अधिक चांगली केली आणि एका जागतीक दर्जाच्या R&D सेंटरची स्थापना केली. महिंद्रा आज ज्या अद्ययावत कार आणत आहे, त्यामागे गोएंकांचा मोठा हात आहे. नंतर गोएंका संचालक आणि सीईओ झाले अन पुढे निवृत्तही झाले.5 / 7काही दिवसांपुर्वी गोएंका हे सहकुटुंब महिंद्राच्या शोरुममध्ये गेले होते, त्यांना स्कॉर्पिओ घ्यायची नव्हती, तर महिंद्राने नुकतीच लाँच केलेली इलेक्ट्रिक SUV, XEV 9e खरेदी करायची होती. त्यांनी या कारची डिलिव्हरी घेतली आणि त्या फोटोवर आनंद महिंद्रांची नजर पडली. 6 / 7महिंद्राच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला ज्या व्यक्तीने बदलले तोच व्यक्ती आज आपल्या कंपनीची नवीन तंत्रज्ञानाची कार खरेदी करतोय, हे पाहून महिंद्रा भावूक झाले. हा फोटो पाहून महिंद्रा यांनी म्हटले की, गोएंका यांचा एक प्रवास पूर्ण झाला. 7 / 7गोएंका २०२१ मध्ये निवृत्त झाले, त्यांनी इन स्पेसचे अध्यक्षपद स्वीकारले. ही सरकारी संस्था अंतराळात खासगी कंपन्याना प्रोत्साहन देते. गोएंका यांनी १४ वर्षे जनरल मोटर्स आणि २८ वर्षे महिंद्रात काम केले. त्यांना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी मोठे योगदान दिले म्हणून नुकतेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.