Pay 10 thousand and bring home HONDA ACTIVA; How much EMI will be per month, read details
१० हजार भरा अन् घरी आणा HONDA ACTIVA; दर महिना किती असेल EMI, वाचा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 5:28 PM1 / 9भारतात दर महिन्याला लाखो दुचाकी विकल्या जातात आणि त्यात बाईकसोबत स्कूटरचीही बंपर विक्री होते. Honda Activa ही स्कूटर सेगमेंटमध्ये बर्याच काळापासून सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. 2 / 9Activa स्कूटर 110 cc आणि 125 सेगमेंटमध्ये आहे. लुक आणि फीचर्ससोबतच या स्कूटरमध्ये पॉवर आणि मायलेजशी कुणाशीही तुलना नाही. Activa स्कूटरचे मायलेज ५५ kmpl पर्यंत आहे. जर तुम्ही सध्या स्वतःसाठी एक चांगली स्कूटर शोधत असाल हा बेस्ट पर्याय आहे. 3 / 9जर तुम्ही कर्ज घेऊन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला Honda Activa 6G चे तिन्ही व्हेरिएंट, DLX आणि एच-स्मार्टवर मिळणारे कर्ज, डाउनपेमेंट आणि मासिक हप्त्याशी संबंधित सर्व तपशीलाची माहिती मिळेल. 4 / 9Honda Activa 6G चा सर्वात स्वस्त व्हेरिएंट, भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर, Activa STD ची एक्स-शोरूम किंमत 75,347 रुपये आणि ऑन-रोड किंमत 89,371 रुपये आहे. जर तुम्ही 10,000 रुपयांच्या डाउनपेमेंटसह कर्ज घेतले तर तुम्हाला 79,371 रुपये कर्ज घ्यावे लागेल. 5 / 9जर कर्जाचा कालावधी 3 वर्षांचा असेल आणि व्याज दर 9% असेल, तर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी ईएमआय म्हणून 2,524 रुपये द्यावे लागतील. Activa स्टँडर्ड व्हेरियंटसाठी कर्ज घेतले तर सुमारे 12,000 रुपये व्याज आकारले जाईल.6 / 9Honda Activa 6G DLX ची एक्स-शोरूम किंमत 77,848 रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 92,101 रुपये आहे. जर तुम्ही 10,000 रुपये डाऊनपेमेंट करून उर्वरित कर्ज घेतले तुम्हाला 82,101 रुपये कर्ज घ्यावे लागेल. 7 / 9कर्जाचा कालावधी 3 वर्षांचा आहे आणि व्याज दर 9% आहे, तर तुम्हाला पुढील 3 वर्षांसाठी मासिक हप्ता म्हणून 2,611 रुपये भरावे लागतील. कर्जावर Activa DLX व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी सुमारे 12,000 रुपये व्याज लागेल.8 / 9Honda Activa 6G H-Smart ची एक्स-शोरूम किंमत 81,348 रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 95,921 रुपये आहे. तुम्ही 10,000 रुपये डाऊनपेमेंट करून Activa H-Smart व्हेरिएंटला कर्ज घेतले तर तुम्हाला 85,921 रुपये कर्ज मिळेल. 9 / 9जर कर्जाचा कालावधी 3 वर्षांपर्यंत असेल आणि व्याज दर 9% असेल, तर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 2,732 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. Activa 6G H-Smart व्हेरियंट खरेदीसाठी कर्ज घेतले तर त्यासाठी रु. 12,000 पेक्षा जास्त व्याज लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications