शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किती दिवसांत सडतं गाडीत टाकलेलं पेट्रोल-डिझेल? अशा इंधनावर गाडी चलवल्यानं होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 7:09 PM

1 / 9
सध्या पेट्रोल आणि डिझेल हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे घटक बनले आहेत. ज्या प्रमाणावर रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढत आहे, त्याच प्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचा वापरही वाढत चालला आहे. यामुळे इंधनाच्या किमतीही गगनाला भिडू लागल्या आहेत.
2 / 9
बाजारात पेट्रोलचे दर थोडे फर कमी झाले, की अनेक लोक लगेचच आपल्या वाहनांच्या टाक्या फूल भरताना दिसतात. पण, पेट्रोल आणि डिझेल देखील एका ठरावीक काळानंतर एक्सपायर होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
3 / 9
काही लोक असे असतात, ज्यांच्या गाड्या काम कमी असल्याने घरांतच उभ्या असतात. तर काही लोक असे असतात, जे इंधनाचे दर कमी झाले, की लगेचच गाड्यांच्या टाक्या फूल करतात. अनेक वाहनांमध्ये तर डिझेल-पेट्रोल तसेच पडून असते. पण, आपण हे वाहन काही महिन्यांनंतर चालवत असाल तर, आपल्या वाहनावर याचा काय परिणाम होतो, हेच आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत.
4 / 9
पेट्रोल-डिझेलही खराब होतं? वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल-डिझेल खराब होते, हेच अनेकांना माहीत नसते. यामुळेच ही बातमी बघून अनेकांना आश्चर्यही वाटले असेल. कारण पेट्रोल आणि डिझेल सारख्या गोष्टी कधीच खराब होत नाहीत, असा अनेकांचा समज आहे. पण तसे नाही. खरे तर, पेट्रोल आणि डिझेल हे कच्च्या तेलापेक्षाही लवकर खराब व्हायरल सुरुवात होते.
5 / 9
शेल्फ लाइफ कमी होते - कच्चे तेल रिफाइन करताना त्यात अनेक प्रकारचे केमिकल्स टाकले जातात. याच बोरबर त्यात इथेनॉलही टाकले जाते. हे केमिकल्स पेट्रोल आणि डिझेलचे शेल्फ लाईफ कमी करते. जेव्हा वाहने अशीच उभी असतात, तेव्हा त्यातील पेट्रोल तसेच पडून असते. यानंतर टेंपरेचरसोबतच त्याचे वाफेत रुपांतर होते. यानंतर, ते पेट्रोल अथवा डिझेल सडते.
6 / 9
किती दिवस चांगलं राहू शकतं पेट्रोल डिझेल - आता आपल्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल, की पेट्रोल आणि डिझेल किती काळापर्यंत चांगले राहू शकते अथवा किती काळानंतर खराब होते? खरे तर, पेट्रोल आणि डिझेल खराब होण्याला तापमान कारणीभूत असते.
7 / 9
तापमान जेवढे अधिक तेवढ्याच लवकर डिझेल-पेट्रोल खराब होऊ शकते. जर आपले वाहन सलग 1 महिना खूप अधिक तापमानात उभे राहिले, तर तेवढ्या वेळात आपल्या वाहनातील इंधन सडेल.
8 / 9
इंजिनवरही होईल परिणाम - जर आपली गाडी 30 डिग्री तापमानात उभी असेल, तर 3 महिने अथवा 20 डिग्री तापमानात उभी असेल तर 6 महिने वाहनात भरलेले इंधन चांगले राहू शकते.
9 / 9
मात्र आपण सडलेल्या इंधनावर गाडी चालवत असाल तर, त्याचा थेट परिणाम वाहनाच्या इंजिनवर होईल. याशिवाय, असे केल्यास वाहनाचे कॉर्बोरेटर आणि इंधन पंपदेखील खराब होण्याची शक्यता वाढते.
टॅग्स :AutomobileवाहनPetrolपेट्रोलDieselडिझेल