शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Polaris Slingshot R: ना दरवाजा...न छत...अन् स्पोर्ट्स कारसारखा लूक; भारतात आली 3 चाकाची सुपरबाईक, किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 6:12 PM

1 / 8
Polaris Slingshot R: स्टीयरिंग व्हील आणि तीन चाक असलेली बाईक तुम्ही कधी पाहिली आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आता अशा प्ररकारची बाईक बाजारात आली आहे. यापूर्वी यामाहाने तीन चाकी स्कूटर आणली होती, पण आज आम्ही याबद्दल नाही तर एका नवीन बाईकबद्दल सांगणार आहोत. ही तीन चाकी बाईक हुबेहुब एखाद्या स्पोर्ट्स कारसारखी दिसते.
2 / 8
काही दिवसांपूर्वी ही बाईक (Polaris Slingshot R) पुण्याच्या रस्त्यावर दिसली होती. ही बाईक रस्त्यावर येताच लोकांची मोठी गर्दी जमली. सोशल मीडियावर फेमस असलेल्या तरुणीने तिच्या बाइक विथ गर्ल नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर या मोटरसायकलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्पोर्ट्स कारसारखी दिसणारी पोलारिस स्लिंगशॉट आर मोटरसायकल नुकतीच दुबईहून भारतात आणली गेली आहे.
3 / 8
या बाईखची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे. साहजिकच वाहनाच्या किमतीव्यतिरिक्त इतर करांचाही यात समावेश असेल. कारसारखी दिसणारी ही सुपरबाईक पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. कशी आहे Polaris Slingshot R? अमेरिकन ऑटोमोबाईल निर्माता पोलारिसने ही मोटरसायकल बनवली आहे. याच्या पुढच्या बाजूला दोन चाके आणि मागच्या बाजूला एक चाक आहे.
4 / 8
यामध्ये कंपनीने 2.0-लिटर क्षमतेचे 4-सिलेंडर प्रोस्टार इंजिन वापरले आहे, जे 203HP पॉवर जनरेट करते. पिकअपच्या बाबतीत या बाईकला तोडच नाही. कंपनीचा दावा आहे की, ही मोटरसायकल केवळ 4.9 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे. या बाईखचा टॉप स्पीड 125 मैल म्हणजेच 201 किलोमीटर प्रति तास आहे.
5 / 8
या बाईकमध्ये कारप्रमाणे स्टीयरिंग व्हीलसह एकूण दोन सीट देण्यात आल्या आहेत. या बाईकमध्ये ना दरवाजा आहे ना छप्पर आहे. कंपनीने दोन सीटच्या मध्ये एक नोटिफिकेशन दिले आहे, ज्यामध्ये हे स्पष्टपणे गाडी चालवताना हेल्मेट घालण्याचा इशारा दिला आहे. या बाईकमध्ये कंपनीने 37.1 लीटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे, ज्यामुळे या बाईकवर लांबचा प्रवास करता येऊ शकेल.
6 / 8
दिसायला आणि आकारात ही स्पोर्ट्स कारसारखीच आहे. कंपनीने या बाईकला अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केले आहे. Slingshot R मध्ये कंपनीने कीलेस एंट्रीसारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय गाडीची चाबी हरवल्यास काळजी करण्याची गरज नाही. या बाईकला तुम्ही पासवर्डनेही अनलॉक करू शकता. ही संपूर्ण प्रोसेस एखादा स्मार्टफोन वापरल्यासारखी आहे.
7 / 8
यात दिल्या जाणाऱ्या टेक्नोलॉजी पॅकेजबद्दल बोलायचे झाले, तर यात 7 इंच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी डिस्प्ले, यूएसबी फोन कनेक्टिविटी, नॅव्हिगेशन, अॅपल कारप्लेसोबत राइड कमांड ऑपरेटेड डिस्प्ले दिला आहे. यात तुम्ही लाइव्ह हवामान/ट्रॅफिकसारखे फीचर्सही वापरू शकता. याच्या स्टीयरिंग व्हीलवर इंटिग्रेटेड कंट्रोल्स मिळतात.
8 / 8
यामुळे तुम्ही स्टीयरिंगवरच अनेक फीचर्स ऑपरेट करू शकता. या बाईकमध्ये स्पीकरदेखील मिळतात. यामुळे तुमचा प्रवास गाणे ऐकत-ऐकत आरामात होऊ शकतो. कंपनीने ही बाईक डेजर्ट स्काय, ग्रेफाइट ब्लू, मियामी ब्लू फेड, लाइम ड्रीम, पॅसिफिक टील हेज अशा 5 रंगांमध्ये आणली आहे. कंपनी या बाइकसोबत 2 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वारंटी देत आहे.
टॅग्स :Automobileवाहनbikeबाईकcarकार