शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Popular Cars : पाहा ५ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कार्स; एव्हरेजही मिळतं जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 1:30 PM

1 / 10
आपली स्वत:ची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु कार घेताना प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न असतात.
2 / 10
कार घेताना तिची किंमत काय असेल? आपण ऑटोमॅटिक कार घ्यावी की मॅन्युअल म्हणजेच गिअर असलेली कार घ्यावी किंवा ती कार किती एव्हरेज देत असेल, हा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो.
3 / 10
अनेकदा आपण कारची किंमत किती म्हणजेच आपल्या बजेटमध्ये आहे का नाही, त्यानंतर त्याची मेंटनेन्स कॉस्ट किती असेल, एव्हरेज, लूक अशा अनेक गोष्टींचा विचार करत असतो. आज आपण पाच लाख रूपयांपर्यंतच्या काही कार्स पाहणार आहोत. ज्या कार्स बजेटमध्येही फिट होतील आणि एव्हरेजही चांगला देतील.
4 / 10
Maruti Alto ही भारतात सर्वाधिक विक्री होत असलेली कार आहे. कंपनीची ही एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत २.९९ लाख रूपयांपासून ४.४८ लाख रूपयांपर्यंत आहे. ही कार २२.०५ किमी/लिटर एव्हरेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
5 / 10
Renault Kwid : जबरदस्त लूक असलेल्या या कारची किंमतीही कमी आहे. त्यामुळे ही कारदेखील भारतीय बाजारात लोकप्रिय आहे. या कारची सुरूवातीची किंमत ३.१२ लाखांपासून आहे. यामध्ये ०.८ लीटर आणि १ लिटर असा इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार २२.३ किमी/ लिटर एव्हरेज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
6 / 10
Maruti Suzuki S-Presso: ही कारदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. या कारची सुरूवातीची किंमत ३.७० लाख रूपये आहे. पेट्रोल मॉडेलबद्दल सांगायचं झालं तर STD आणि LXi या दोन्ही व्हेरिअंटमध्ये २१.४ किलोमीटरचा एव्हरेज मिळतो. तर दुसरीकडे VXi आणि VXi+ मध्ये २१.७ किमी/ लिटरचा एव्हरेज मिळतो.
7 / 10
यामध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन मिळते. यामध्ये सीएनजी बसवल्यास ३१.२ किलोमीचरचा प्रति किलो इतका एव्हरेज मिळत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. सीएनजी मॉडेलची किंमत ४,८४ लाख रूपये इतकी आहे.
8 / 10
Hyundai Santro सारख्या एन्ट्री लेव्हल कार्सची भारतात मोठी बाजारपेठ आहे. एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये सॅन्ट्रोदेखील चांगली कार आहे. याची दिल्लीत सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ४.६७ लाख रूपये आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही कार २०.३ किलोमीटर तर सीएनजी असलेली सँट्रो जवळपास ३०-३१ किलोमीटरचा एव्हरेज देते.
9 / 10
Tata Tiago ही एन्ट्री लेव्हलची हॅचबॅक कार्समधील लोकप्रिय कार आहे. टाटा टियागोचं AMT ट्रान्समिशन व्हेरिअंट 23.84 किमी / लिटर इतकं एव्हरेज देतं.
10 / 10
Tata Tiago ची सुरुवातीची किंमत ४.८५ लाख रूपये (एक्स शोरूम) इतकी आहे. ही कार ९ व्हेरिअंट XE, XT, XTA, XZA, XZA, XZ +, XZ + DT, XZA + आणि XZA + DT मध्ये उपलब्ध आहे. ही कार केवळ १.२ लिटर पेट्रोल इंजिनसह येते.
टॅग्स :carकारMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाHyundaiह्युंदाईRenaultरेनॉल्ट