शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोर्शची नवी एसयुव्ही Cayenne तीन प्रकारांत लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:14 PM

1 / 6
आघाडीची आलिशान कार निर्माता कंपनी पोर्शने नुकतीच एसयुव्ही श्रेणीतील Cayenne ही कार भारतात लाँच केली. या कारची तीन व्हर्जन उपलब्ध करण्यात आली असून किंमत 1 कोटी 19 लाखांपासून सुरु होत आहे.
2 / 6
नव्या Cayenne मध्ये दोन इंजिनचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. V6 आणि V8 ही दोन इंजिन पेट्रोलमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. V6 हे इंजिन 340 एचपी आणि V8 हे इंजिन 550 एचपी एवढी उर्जा निर्माण करते. ही इंजिन आठ स्पीड टीपट्रॉनिक एस ट्रान्समिशनने युक्त आहेत. या Cayenne च्या श्रेणीतील टॉप व्हेरिअंट Cayenne Turbo हे शून्य ते 100 किमीचा वेग अवघ्या 3.9 सेंकदात पकडते. या कारचा टॉप स्पीड 268 किमी प्रती तास आहे.
3 / 6
पोर्शने Cayenne ही एसयुव्ही तीन श्रेणींमध्ये बाजारात आणली आहे. Cayenne, Cayenne E-Hybrid आणि Cayenne Turbo अशी तीन श्रेणी आहेत. E-Hybrid कार 462 एचपीची ताकद निर्माण करते, ही प्रणाली 918 स्पायडर सुपरकारपासून घेण्यात आली आहे. एका चार्जमध्ये ही कार 44 किमी धावते. या कारचा टॉप स्पीड 135 किमी प्रती तास आहे.
4 / 6
जुन्या कारपेक्षा लगेज स्पेस 100 लीटरनी वाढविण्यात आली आहे. 12.3 इंचाची टचस्क्रीन आणि ड्रायव्हरसाठी PCM देण्यात आला आहे. 4D चेसिस कंट्रोल, थ्री चेंबर एअर सस्पेंशन, इलेक्ट्रीक 48 व्होल्ट रोल स्टॅबिलायझेशन आदी नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
5 / 6
तसेच या कारमध्ये एलईडी हेडलाईट, वॉर्न आणि ब्रेक असिस्ट, पेडिस्ट्रीअन प्रोटेक्शन, क्रूझ कंट्रोल आणि फ्रंट आणि रिअर पार्क असिस्ट या सुविधा स्टँडर्ड देण्यात आल्या आहेत.
6 / 6
Cayenne ची किंमत 1,19,36,000 रुपये तर Cayenne E-Hybrid ची किंमत 1,58,06,000 रुपये आणि Cayenne Turbo ची किंमत 1,92,10,000 रुपये ठेवण्यात आली आहे.
टॅग्स :Porscheपोर्शेcarकारElectric Carइलेक्ट्रिक कार