शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आली नवी कोरी E-Bike; फुल चार्जमध्ये १३० किमी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 4:59 PM

1 / 10
इलेक्ट्रिक टू व्हिलर सेग्मेंटमध्ये आणखी एका नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. दुचाकी वाहन उत्पादक कंपनी PURE EV नं आज बाजारात त्यांची नवी कोरी इलेक्ट्रीक मोटारसाईकल EcoDryft लॉन्च केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक दुचाकीत अजून एक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.
2 / 10
आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी पॅकनं सुसज्ज अशा या बाईकची सुरुवातीची किंमत केवळ ९९ हजार ९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दिल्लीव्यतिरिक्त अन्य राज्यात याची किंमत १ लाख १४ हजार ९९९ इतकी आहे. ही बाईक ४ रंगामध्ये बाजारात उपलब्ध होईल. ज्यात ब्लॅक, ग्रे, ब्ल्यू आणि रेड कलरचा समावेश असेल.
3 / 10
कंपनीनं या इलेक्ट्रीक बाईकमध्ये ३.० KWH क्षमतेची बॅटरी पॅकचा वापर केला आहे. ही बाईक सिंगल चार्जमध्ये ८५ ते १३० किमी अंतर सहज पार करेल असा दावा कंपनीने केला आहे. ही ड्राइव्हिंग रेंज रायडिंग आणि रोड कंडिशनवर निर्भर आहे.
4 / 10
या बाईकमध्ये बॅटरी मेनजमेंट सिस्टम(BMS) आणि ब्ल्यूटूथ केनक्टिव्हिटीसह ३ KW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. त्याचसोबत ही बाईक ७५ किमी प्रतितास वेगाने धावू शकते. ही बाईक दिसायला कॅम्प्युटर बाईकसारखी आहे. त्यात फ्यूल टँकखाली बॅटरी पॅक दिला आहे.
5 / 10
या इलेक्ट्रीक बाईकमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. ज्यात ड्राईव्ह मोड ४५ किमी प्रतितास, क्रॉसओवर मोड ६० किमी प्रतितास आणि थ्रील मोड ७५ किमी प्रतितास वेग पकडण्याची क्षमता आहे. त्याची लोडिंग कॅपेसिटी एकूण १४० किलोग्रॅम आहे.
6 / 10
अलॉय व्हील आणि रिजनरेटिंग ब्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, पॅसेंजर फूटरेस्ट, एलईडी हेडलाईट आणि टेललाइट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
7 / 10
या बाईकचे एकूण वजन १०१ किलो आहे. या बाईकची बॅटरी अवघ्या ३ तासात २० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते, तर तिची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी एकूण ६ तास लागतात. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचं टेन्शन ग्राहकांना राहणार नाही.
8 / 10
PURE EV चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित वडेरा यांनी सांगितले की, “गेल्या दोन महिन्यांत आम्ही चाचणी ड्राइव्हसाठी आमच्या 100+ डीलरशिपवर डेमो वाहने उभी केली आहेत आणि ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
9 / 10
आता आमच्या सर्व डीलरशिपवर EcoDryft चं बुकींग सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाहनांच्या पहिल्या बॅचची डिलिव्हरी सुरू होईल. EcoDryft हैदराबादच्या PURE EV तंत्रज्ञान आणि उत्पादन केंद्रावर डिझाईन विकसित करण्यात आले आहे.
10 / 10
कंपनी देशातील इतर अनेक शहरांमध्ये डीलरशिप नेटवर्कचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये आपली वाहने निर्यात करत आहे आणि लवकरच आफ्रिकेसह मध्य आशियाई देशांमध्ये वाहने निर्यात करेल असा दावा कंपनीने केला आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर