1 / 6जॅगुआर लँडरोवर भारतीय बाजारात सातत्यानं आपली एसयूव्ही रेंज अपडेट करत आहे. नुकतंच कंपनीनं वेलार आणि स्पोर्ट एसव्हीआर बाजारात सादर केली होती. 2 / 6आता कंपनीनं Range Rover Evoque या एसयूव्हीचं नवं व्हर्जन लाँच केलं आहे. अतिशय आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षणता या कारमध्ये देण्यात आली आहे.3 / 6कंपनीनं Range Rover Evoque चं केवळ आर डायनॅमिक एसई व्हेरिअंट लाँच केलं आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कंपनीनं इवोक नव्या BS6 इंजिनसह अपडेट करून रिलाँच केली होती. 4 / 6त्यावेळी त्या कारची किंमत 59.85 लाख रूपये होती. नवी Range Rover Evoque ही यापूर्वीच्या कारच्या तुलनेत अधिक महाग आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 64.12 लाख रूपये इतकी आहे.5 / 6ही कार महाग असली तरी यापूर्वीच्या कारच्या तुलनेत यामध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स देण्यात येतात. कंपनीनं कारच्या डिझाईनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.6 / 6 ही एसयूव्ही ड्युअल टोन अपहोल्सटरी पर्यायासह येते. यामध्येही टाईम रनिंग लाईट्स (DRL) सह स्लीक एलईडी हेडलँप्स, फ्लश टाईप डोअर हँडल, टेपर्ड रुफलाईन आणि नवी रँप अराऊंड टेल लाईट देण्यात आली आहे.